Mla Carlos Ferreira Dainik Gomantak
गोवा

Mla Carlos Ferreira: हळदोणाचे आमदार कार्लुस फेरेरा यांना मातृशोक

जुन्या काळातील पियानोवादक आणि संगीत शिक्षिका अशी ओळख असलेल्या मारिया फेरेरा यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केला.

दैनिक गोमन्तक

Aldona Mla Carlos Ferreira: हळदोणेचे आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा अल्वारिस यांच्या मातोश्री मारिया कॅमिला पेरेग्रीनो दा कोस्टा फेरेरा अल्वारिस (९३) यांचे मंगळवारी निधन झाले. जुन्या काळातील पियानोवादक आणि संगीत शिक्षिका अशी ओळख असलेल्या मारिया फेरेरा यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केला.

बुधवार, 13 रोजी दुपारी 4 वाजता त्यांची अंत्ययात्रा चर्च स्क्वेअरमध्ये अल्वारिस निवासमधून होली स्पिरीट चर्चमध्ये अंतिम प्रार्थनेसाठी नेली जाणार आहे.

सुरुवातीला पोर्तुगीज विमान कंपनीत काम करणाऱ्या मारिया यांनी लग्न झाल्यावर मडगाव येथे स्थायिक होऊन पियानो वादनावर लक्ष केंद्रित केले.

त्यांनी अनेक चांगले संगीतकार तयार केले. जगप्रसिद्ध पॉप गायक रेमो फर्नांडिस हे त्यापैकी एक. त्यांच्यावर बुधवारी (ता.१३) सायंकाळी ४ वाजता, होली स्पिरिट चर्च, मडगाव येथे अंतिम संस्कार होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa School: आगरवाडा हायस्कूल इमारतीची आरोलकरांकडून पाहणी; कामातील त्रुटींवर व्यक्त केली नाराजी

Mulgao mining: मुळगावात खाणविरोधातील लढा संघटितपणे तीव्र करण्याचा निर्धार; जाहीर सभेत गावकऱ्यांची वज्रमूठ!

Mexico Shooting: मेक्सिकोमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांचा अंदाधुंद गोळीबार, लहान मुलासह 10 जणांचा जागीच मृत्यू; शेकडो लोकांनी सोडली घरे

Dudhsagar Jeep Election: जीप असोसिएशनच्या निवडणुकीत नीलेश वेळीप यांचा डंका, दिलीप मायरेकर आणि मयूर मराठेही विजयी; नव्या नेतृत्वाला कौल!

Gajakesari Rajyoga 2026: नोकरीत प्रमोशन, व्यवसायातून कोट्यवधींचा नफा कमावण्याची संधी! 'गजकेसरी राजयोग' ठरणार वरदान; 5 राशींची आर्थिक चिंता मिटणार

SCROLL FOR NEXT