Aldona Dainik Gomantak
गोवा

Aldona Market : हळदोणा मार्केट इमारतीवर हातोडा; ४० वर्षांहून जुनी इमारत

Aldona Market Demolition : या मार्केटचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित होता. ही इमारतीची जीर्ण झाल्याने धोकादायक स्थितीत उभी होती.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा जीर्ण तसेच मोडकळीस आलेली चाळीस वर्षे जुनी हळदोणे येथील मार्केट इमारत पाडण्याचे काम पंचायतीने अखेर सोमवारपासून (ता.२९) हाती घेतले आहे. हे काम सीएसआर अंतर्गत करण्यात येत असून कामगारांकडून इमारतीमधील भंगार हटविण्यास सुरवात केली आहे.

या मार्केटचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित होता. ही इमारतीची जीर्ण झाल्याने धोकादायक स्थितीत उभी होती. इमारत असुरक्षित म्हणून याआधीच घोषित केले होते. ही इमारत दुरुस्ती करण्यापलीकडे आहे, असे गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाने २०१४ मधील आपल्या अहवालात नमूद केले होते.

त्यानंतर तीनवेळा ही इमारत खाली करण्यासंबंधी नोटीस काढली, परंतु त्याची कार्यवाही झाली नाही. अखेर, या इमारतीची सील प्रक्रिया पंचायतीने (ता.१९) पार पाडली व सोमवारपासून बांधकाम पाडण्याचे काम हाती घेतले.

जीर्णावस्थेमुळे एकमजली इमारतीचे काँक्रिटचे तुकडे कोसळत होते. मध्यंतरी, याच इमारतीचा भला मोठा छताचा काँक्रिट तुकडा कोसळला होता, मात्र सुदैवाने जीवितहानी टळली होती.

सध्या पडणाऱ्या पावसामुळे इमारतीमधील व्यवहार सुरु ठेवणे अयोग्य होते. कारण, दुर्घटना घडण्याची शक्यता तसेच विक्रेते-गिऱ्हाइकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने पंचायतीने ही इमारत सील करून ती पाडण्याचा निर्णय घेतला.

विक्रेत्यांच्या पुनर्वसनाचा विषय खितपत

या मार्केटमधील विक्रेत्यांच्या पुनर्वसनाचा विषय खितपत पडला आहे. पंचायत आता संबंधित विक्रेत्यांना कुठे जागा उपलब्ध करून देते, याबाबत उत्सुकता आहे. कारण अनेकांचा उदरनिर्वाह याच मार्केटमधील व्यवहारावर अवलंबून होता.

या इमारतीत जवळपास ३० ते ४० विक्रेते होते. पहिल्या मजल्यावर हेअर कटिंग सलून तसेच रेडिओ मेकॅनिक चालू होते. तळमजल्यावर लहान-मोठी आस्थापने व भोजनालय होते. तसेच इमारतीच्या बाहेर भाजी व मासे विक्रेत्या महिला बसायच्या. सध्या हे विक्रेते रस्त्यावर किंवा फुटपाथवर बसत आहेत.

सुरक्षिततेच्या कारणास्तव ही इमारत पाडण्याचा निर्णय पंचायतीने घेतला आहे. सध्या पहिल्या मजल्यावर भंगार हटविण्याचे काम सुरु आहे. पूर्ण मार्केट इमारत पाडण्यास आठवडाभर जाईल.

- आश्विन डिसोझा, सरपंच, हळदोणे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: कळंगुट येथील चोरीप्रकरणी एकास अटक, 3 लाखांचा मुद्देमालही जप्त!

Kartik Aaryan: ना गाजावाजा न कसाला धिंगाणा; कार्तिकने गोव्यात शांततेत साजरा केला वाढदिवस पाहा Photo, Video

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात चहा, कॉफीसारखे गरम पेय का टाळावेत?

त्या 'मॅडम'ला पकडून देण्याचा गोमंतकीयांनी निर्धार केलाय! Cash For Job प्रकरणावरुन सरदेसाई पुन्हा बरसले

Ranbir Kapoor In IFFI: 'मला आजही त्या गोष्टीची लाज वाटते'; इफ्फीच्या मास्टरक्लामध्ये रणबीर केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT