Goa Weather Updates  Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon: चिंताजनक! गोव्यात जूनमध्ये केवळ 6.8 इंच पाऊस

पेरण्या खोळंबल्या, धरणातील पाणीही आटू लागले

Akshay Nirmale

Goa Monsoon: भारतात मॉन्सूनची सुरवात होणे ही आनंदवार्ता मानली जाते. कारण भारताची अर्थव्यवस्था मॉन्सून कसा बरसतो, यावर अवलंबून असते. तथापि, मॉन्सुनला सुरवात होऊन, बरेच दिवस झाले असले तरी म्हणावा असा पाऊस झालेला नाही.

गोव्यातही स्थिती फारशी चांगली नाही. 1 जून ते 19 जून या काळात गोव्यात केवळ 6.8 इंच पाऊस झाला आहे.

हे चिंताजनक चित्र असून त्याचा परिणाम शेतकऱ्यांसह एकंदरित अनेक बाबींवर होणार आहे. भारतात पाऊस चांगला झाला तर शेती चांगली होते. आणि शेती चांगली झाली तर अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते नाही तर महागाईच्या रूपाने त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो.

एकंदरीत मॉन्सून भारतासाठी खूप महत्वाचा आहे. मॉन्सून हा भारतावर आणि भारतीयांवर मोठा प्रभाव पाडणारा घटक आहे.

गोव्यात सुरवातीला भारतीय वेधशाळेने 13 ते 14 जून रोजी मॉन्सुनला सुरवात होईल, असे सांगितले होते. तथापि, बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम मॉन्सूनच्या गतीवर झाला. आणि मॉन्सून केरळमधून वेगाने गोव्यात दाखल झाला.

तथापि, मॉन्सूनपूर्व पाऊस आणि मॉन्सूनचा पाऊस या दोन्हींमध्ये यंदा घट दिसून येत आहे. गोव्यात गतवर्षी म्हणजेच 1 जून 2022 ते 19 जून 2022 या काळात 18.17 इंच पाऊस झाला होता. यंदा मात्र हे प्रमाण केवळ 6.8 इंच इतकाच आहे. यंदाच्या मॉन्सूनमध्ये गोव्यातील पावसाची सरासरी तूट 67.5 टक्क्यांवर पोहचली आहे.

याचा एकूणच परिणाम राज्यातील शेतीवर झाला आहे. पाऊसच नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. तर दुसरीकडे गोव्यातील एक-एक धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस आटत चालला आहे.

यापुर्वीच काही धरणांतील पाणीसाठा खालावल्याने काही भागांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. आणखी काही दिवस पावसाची अशीच परिस्थिती राहिल्यास राज्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Satyapal Malik: घटनात्मक पदावर असतानाही सरकारविरुद्ध उघडपणे बोलणारे, बेधडक सत्य सांगणारे 'सत्यपाल मलिक'

Goa: 'कर्ज काढून सण साजरे केले नाहीत', मुख्यमंत्र्यांचे सडेतोड उत्तर; मतदारसंघासाठी 100 कोटींची तरतूद केल्याची दिली माहिती

Rashi Bhavishya 06 August 2025: तांत्रिक कामे किंवा इलेक्ट्रॉनिक बाबतीत दक्षता घ्या, आरोग्याकडे दुर्लक्ष नको

Goa Fake Wedding Party: ना सासरचं टेन्शन, ना खर्चाची चिंता! गोव्यात 'फेक वेडिंग' इव्हेंटनं तरूणांना दिला लग्नसोहळ्याचा अनुभव

Uttarakhand Cloudburst: उत्तरकाशीत निसर्ग कोपला, ढगफुटीमुळे घरं गेली वाहून; कित्येकजण बेपत्ता

SCROLL FOR NEXT