Akhilesh Yadav Dainik Gomantak
गोवा

Samajwadi Party Goa: गोव्याच्या राजकारणात समाजवादी पक्षाची एन्ट्री, अखिलेश यादव काँग्रेसचा खेळ बिघडवणार?

Samajwadi Party Enters In Goa: यूपीमध्ये दबावाचे राजकारण करणाऱ्या काँग्रेसला गोव्यात सपाच्या प्रवेशामुळे धोका होऊ शकतो.

Pramod Yadav

Samajwadi Party Enters In Goa

पणजी: गोव्याच्या राजकारणात समाजवादी पक्षाने एन्ट्री केली आहे. नुकतेच सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी त्यांचे विश्वासू आणि जवळचे सहकारी मनीष जगन अग्रवाल यांना सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि गोवा राज्याचे प्रभारी म्हणून निवड केली आहे. सपा राष्ट्रीय पक्ष बनण्याच्या दिशेने हा निर्णय एक मोठे पाऊल मानले जात आहे.

गोव्यात सध्या भाजप सत्तेत आहे. गोव्यात सध्या भाजपचे २८, काँग्रेसचे तीन, आम आदमी पार्टीचे दोन, मगोचे दोन, तीन अपक्ष आणि दोन अन्य पक्षाचे आमदार आहेत. राज्यात आता सपाचा प्रवेश काँग्रेससाठी अडचणीचा ठरु शकतो.

यूपीमध्ये दबावाचे राजकारण करणाऱ्या काँग्रेसला गोव्यात सपाच्या प्रवेशामुळे धोका होऊ शकतो. गोव्यात काँग्रेस आणि भाजप हे दोनच पक्ष अधिक काळासाठी सत्तेत आहेत आणि सपाचा प्रवेश काँग्रेससाठी थेट धोका ठरू शकतो.

छोट्या राज्यात पक्ष वाढवण्याचा प्रयत्न अनेक पक्ष करत असतात. केजरीवालांचा आम आदमी पक्ष आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने गोव्यात एन्ट्री केल्यानंतर आता अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने राज्यात प्रवेश केला आहे. तृणमूल काँग्रेसला राज्यात यश नसले मिळाले तरी गेल्या निवडणुकीत आपचे दोन आमदार निवडून आले आहेत. आता सपा येत्या निवडणुकीत (२०२७) नशीब आजमवणार आहे. यात पक्षाला किती यश मिळेल हे वेळच सांगू शकेल.

दरम्यान, सपाची गोव्यातील एन्ट्री काँग्रेसचे टेन्शन वाढवणार आहे. तसेच, राज्यात इंडिया आघाडीत सपा सहभागी झाल्यास आघाडीतील पक्षांचे देखील डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. शिवाय विधानसभेत जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील बदलण्याची शक्यता आहे. गोव्यात विधानसभेच्या 40 जागा आहेत.

गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यात डॉ. राम मनोहर लोहिया यांचे मोठे योगदान होते आणि गोवा हे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईनंतर वेगाने विकसित होत असलेले राज्य आहे. येथे आर्थिक घडामोडी वेगाने वाढत आहेत आणि मनीष जगन अग्रवाल यांचे बिझनेस असेंब्लीचे अध्यक्ष म्हणून निवड सपासाठी फायदेशीर ठरू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT