National Defense Academy  Dainik Gomantak
गोवा

National Defense Academy: बालपणीचे स्वप्न झाले साकार

पर्वरीच्या आकाश साटम याला राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (National Defense Academy ) प्रवेश मिळाला

दैनिक गोमन्तक

पणजी: लहानपणी आपण अमूक होणार, तमूक होणार असे मुले सांगत असतात. मात्र, बालपणीचे स्वप्न किशोरवयात पूर्ण होण्याची संधी फारच कमी जणांना मिळते. पर्वरीच्या आकाश अभयनाथ साटम याला ती संधी मिळाली आहे. (Akash Abhaynath Satam of Porvorim got admission in National Defense Academy in Pune)

अवघ्या तिसरीत असताना त्याने संरक्षण दलाच्या माध्यमातून देशसेवेत जाण्याचे ध्येय बाळगले आणि आता ते पूर्ण होणार आहे. पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत त्याला प्रवेश मिळाला असून त्याने राष्ट्रीय पातळीवर 67 वा क्रमांक पटकावला आहे. त्याची बारावीत असणारी बहिण जान्हवी हिलाही संरक्षण दलातच करिअर करण्याची इच्छा आहे.

आकाशचा हा प्रवास त्याची आई अनुश्री यांनी उलगडला. त्यांनी सांगितले, अभयला संरक्षण दलात जायचे होते. त्यासाठी सैनिक स्कूलचे अनेक पर्याय होते. मात्र, सैनिक स्कूलमधील सारीच मुले लष्करी सेवेत जातात असे नव्हे. त्यामुळे संरक्षण दलात हमखास प्रवेश मिळवून देण्याजोग्या विद्यालयाचा शोध सुरू केला. डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मिलीटरी कॉलेजची माहिती मिळाली. राष्ट्रीय पातळीवरून वर्षाला केवळ २० जणांनाच प्रवेश या विद्यालयात दिला जातो.

आकाशने चौथीपर्यंतचे शिक्षण पर्वरीच्या यंग ॲचिवर्स प्राथमिक विद्यालयात घेतले, पर्वरीच्याच ज्ञानविकासमध्ये पाचवीचे शिक्षण त्याने घेतले. आठवीपासून बारावीपर्यंत तो डेहराडून येथे शिकला आणि आता पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत जाण्यासाठी सज्ज झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT