Pravin Arlekar

 

Dainik Gomantak 

गोवा

आजगावकर 'तेव्हा' मडगावात झोपा काढत होते: प्रवीण आर्लेकर

भाजपचे (BJP) नेते प्रवीण आर्लेकर (Pravin Arlekar) यांनी बाबू आजगावकर यांच्यावर निशाणा साधला.

दैनिक गोमन्तक

मोरजी: आपण बाबू आजगावकर (Babu Ajgaonkar) यांच्यासारखी खोटी आश्वासने देणार नाही तर आपण कृती करणार. बाबू विश्वासघातकी आहेत. कोरोना महामारीच्‍या काळात ते आपल्‍या पेडणे मतदारसंघात फिरकण्याऐवजी मडगावला झोपा काढत होते. त्‍यांना आता तेथेच पाठवून द्या. तसेच आमदार म्‍हणून‍ आपल्‍याला साथ द्या. आपण निवडून आलो तर भविष्यात तुम्हाला पेडणे मतदारसंघात एकही बेरोजगार युवक दिसणार नाही, अशी ग्वाही भाजपचे (BJP) नेते प्रवीण आर्लेकर (Pravin Arlekar) यांनी दिली. (Pravin Arlekar Criticises Babu Ajgaonkar )

थर्मास-वझरी येथे चॅपेलचे लोकार्पण केल्यानंतर आर्लेकर बोलत होते. यावेळी पेडणे (Pernem) भाजप मंडल अध्यक्ष तुळशीदास गावस, धारगळ सरपंच भूषण नाईक, नगरसेविका अश्विनी पालयेकर, विशाखा गडेकर, नगरसेवक माधव सिनाई देसाई, शिवराम तुकोजी, माजी सरपंच बबन डिसोझा, विर्नोडाचे माजी सरपंच भारत गावडे, कोरगावच्‍या माजी सरपंच स्वाती गवंडी, वझरीच्‍या माजी सरपंच संगीता गावकर, माजी पंच आवेलीन फर्नांडिस, पंच आश्विनी परब, कृष्णा पालयेकर, जयेश पालयेकर, रमाकांत तुळसकर, नरेश कोरगावकर आदी उपस्थित होते.

आता लोकांना बदल हवा आहे. 20 वर्षे आमदारकी भोगूनही एकाही अपंगाला त्यांना मदत करता आली नाही. स्वत:च्या नव्हे तर सरकारच्या (Government) निधीतून मदत करता आली असती, पण तीसुद्धा केली नाही. आपण गरिबांसमवेतच सर्वाना सोबत घेऊन जाणार आहे. तालुक्यातील प्रकल्पांमध्‍ये स्थानिकांना रोजगार देण्यासाठी आपले प्राधान्य असेल, असे आर्लेकर यांनी स्‍पष्‍ट केले.

फादर पीटर मेंडिस म्‍हणाले की, काही नेते बोलतात खूप, पण काम करतात कमी. मात्र प्रवीण आर्लेकर हे बोलतात कमी आणि कृती गतीने करतात. अशा नेत्यांना लोकांचा आशीर्वाद असतो. यावेळी तुळशीदास गावस, संगीता गावकर, स्वाती गवंडी, बबन डिसोझा, कृष्णा पालयेकर, आवेलीन फर्नांडिस आदींनी भाषणे केली. स्वागत आणि सूत्रसंचालन महादेव गवंडी यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT