Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: कॉर्डेलिया क्रुझवरुन बेपत्ता झाला, सेर्नाभाटी किनाऱ्यावर आढळला सडलेला मृतदेह; व्‍हिजिटिंग कार्डावरून लागली ओळख

Sernabatim Beach: मुंबई ते गोवा या ‘कॉर्डेलिया’ प्रवासी बोटीवरून बेपत्ता झालेल्या एकाचा मृतदेह शनिवारी (१९ एप्रिल) सायंकाळी सेर्नाभाटी किनाऱ्यावर आढळला.

Sameer Amunekar

मडगाव: मुंबई ते गोवा या ‘कॉर्डेलिया’ प्रवासी बोटीवरून बेपत्ता झालेल्या एकाचा मृतदेह शनिवारी (१९ एप्रिल) सायंकाळी सेर्नाभाटी किनाऱ्यावर आढळला. अजय केळकर असे त्‍याचे नाव आहे. त्‍याच्‍याकडे सापडलेल्या व्‍हिजिटिंग कार्डावरून त्याचे नाव समजले.

मृतदेह संपूर्ण सडलेला होता. पोलिस तपासात त्याची ओळख पटली. पंधरा दिवसांपूर्वी वास्को येथून तो त्या जहाजावरून बेपत्ता झाला होता. त्याने समुद्रात उडी मारली होती, असे पोलिसांनी सांगितले.

शनिवारी सेर्नाभाटी किनारपट्टीवर तैनात पर्यटन पोलिसांना हा मृतदेह नजरेस पडला. मागाहून कोलवा पोलिसांना त्याबाबत कळविण्यात आले.

घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. अनैसर्गिक मृत्यू म्हणून कोलवा पोलिसांनी हे प्रकरण नोंद केले असून मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे. उपनिरीक्षक प्रथमेश महाले पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT