Airtel Recharge : Airtel has increased Recharge
Airtel Recharge : Airtel has increased Recharge  Dainik Gomantak
गोवा

महागाईचा फटका बसला मोबाइलच्या रिचार्जना..!

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार सेवा प्रदाता कंपनी म्हणजेच एअरटेलने (Airtel Recharge) प्रीपेड प्लॅनच्या दरात वाढ (increased) करण्याची घोषणा केली असून कंपनीने यामध्ये 25 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. 26 नोव्हेंबरपासून हे नवीन टॅरिफ दर लागू होणार असून एअरटेलनंतर आता इतर टेलिकॉम कंपन्याही दर वाढवू शकतात.

दरम्यान कंपनीने दिलेल्या माहिती नुसार त्यांचा 79 रुपयांचा बेस प्लान आता 99 रुपयांचा झाला आहे, तसेच 50 टक्के जास्त टॉकटाइम मिळेल. त्याचप्रमाणे 149 रुपयांचा प्लॅन आता 179 रुपयांना मिळणार असून, यात अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि 28 दिवसांच्या वैधतेसह एकूण 2 GB डेटा मिळेल. त्याचप्रमाणे 219 रुपयांचा प्लॅन आता 265 रुपयांचा झाला आहे. यामध्ये, 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 100 एसएमएस आणि 1 जीबी डेटा उपलब्ध असेल.

एअरटेल बेस प्लान 20 रुपयांनी महाग झाला आहे, तर सर्वात महागड्या प्लानमध्ये 501 रुपयांची वाढ झाली आहे.

कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात महागडा प्लान 2498 रुपयांचा होता, जो आता 2999 रुपयांचा झाला आहे. यामध्ये अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि 2 जीबी डेटा एका वर्षासाठी उपलब्ध आहे.

दर आणखी वाढण्याची शक्यता

एअरटेलने एका निवेदनात म्हटले आहे की प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (ARPU) 200 रुपये असावा आणि नंतर तो 300 रुपयांपर्यंत वाढवावा. जेणेकरून गुंतवलेल्या भांडवलावर कंपन्यांना वाजवी परतावा मिळू शकेल. निरोगी व्यवसाय मॉडेलसाठी हे आवश्यक असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीने असेही म्हटले आहे की या स्तरावर ARPU आल्याने नेटवर्क आणि स्पेक्ट्रमसाठी आवश्यक गुंतवणूक उपलब्ध होईल. यासोबतच कंपनीला देशात 5G सेवा सुरू करण्यासाठी संसाधने मिळू शकतील. त्यामुळे कंपनीने नोव्हेंबरमध्ये दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT