Adv Aires Rodrigues  Dainik Gomantak
गोवा

Aires Rodrigues: ''मी देशाचे नागरिकत्व सोडले; मात्र भारतीय वंशाचा असल्याने येथेच राहणार...''

पोर्तुगीज नागरिकत्व वादावर अखेर पडदा

गोमन्तक डिजिटल टीम

Aires Rodrigues समाजकार्यकर्ते ॲड. आयरिश रॉड्रिग्स यांच्या दुहेरी नागरिकत्वामुळे राज्यात बरीच खळबळ माजली होती. मी पोर्तुगीज नागरिक असल्याचा दावा सरकारने केला होता.

त्यावर कायमचा पडदा टाकण्यासाठी सखोल विचार करून मी भारतीय नागरिकत्वाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मी भारतीय वंशाचा असल्याने येथेच राहणार आहे, असे मत रॉड्रिग्स यांनी व्यक्त केले.

मी भारतीय नसून पोर्तुगीज नागरिक असल्याचा काहीजणांनी आरोप केला होता. त्यासंदर्भात सरकारनेही त्यावर शिक्कामोर्तब केले होते. माझा जन्म २४ मे १९६० रोजीचा, म्हणजे गोवा मुक्तीपूर्वीचा आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या मी जन्मतः पोर्तुगीज आहे. मी पोर्तुगीज राष्‍ट्रीयत्वासाठी कधीही अर्ज केला नव्हता.

मात्र, होणाऱ्या आरोप व टीकेला कायमचा विराम देण्यासाठी गेल्या महिन्यात पोर्तुगालला जाऊन सत्य परिस्थिती जाणून घेतली आणि पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

मी पोर्तुगीज नागरिक असल्याने भारतात मतदानाबरोबरच निवडणूक लढवता येणार नाही तसेच शेतजमीन खरेदी करणे किंवा त्यामध्ये गुंतवणूक करणे शक्य होणार नाही, याची मला जाणीव आहे.

यूके आणि शेंजेन व्हिसा मिळाल्यानंतर मी लंडनमार्गे पोर्तुगालला गेलो. लिस्बनमध्ये मी अत्यंत विनम्र पोर्तुगीज अधिकाऱ्यांना भेटलो, ज्यांनी मला कळवले की, मी पोर्तुगीज पासपोर्टसाठी पात्र आहे. पोर्तुगीज अधिकारी मला पोर्तुगीज नागरिक म्हणून कोणी नोंदणीकृत केले असल्यास ते मला कळवू शकले नाहीत.

मला हे पाहून आश्चर्य वाटले की, गोव्यातील अनेक विद्यमान आणि माजी राजकारणी, प्रमुख नागरिक आणि काही सरकारी अधिकारी हे सर्व लिस्बनमधील नोंदीनुसार पोर्तुगीज नागरिक म्हणून नोंदणीकृत आहेत. हे पाहता गोवा सरकारने मला का बाहेर काढले, याचे मला कुतूहल वाटले.

ओसीआय (भारताचे परदेशी नागरिक) म्हणून माझ्यासाठी व्यावसायिक आघाडीवर काहीही बदल होत नाहीत. याउलट यामुळे मला माझी क्षितिजे रुंदावता येतील. कारण मी आता माझ्या सहकारी गोमंतकीयांना आणि परदेशातील भारतीयांना भेडसावणाऱ्या कायदेशीर समस्यांना सामोरे जाऊ शकेन.

गेल्या काही वर्षांत आम्ही आमचे सहकारी गोमंतकीय पोर्तुगीज पासपोर्ट मिळवण्यासाठी लाखो रुपये देत असल्याचे पाहिले आहे. आता माझ्यासाठी हे मोफत बोनान्झा म्हणून आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Video: हार्दिकच्या धडाकेबाज खेळीवर गर्लफ्रेंड फिदा! सोशल मीडियावर रंगली 'फ्लाइंग किस'ची चर्चा; मैदानावरच प्रेमाचा वर्षाव

IND vs SA 5th T20: अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याचं वादळ, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक; अभिषेक शर्माचा मोडला रेकॉर्ड VIDEO

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

SCROLL FOR NEXT