Silly Souls Café and Bar | Smriti Irani Dainik Gomantak
गोवा

Smriti Irani : सिली सोल्सकडून मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याला केराची टोपली?

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या आवाहनाला जागत स्मृती इराणी आपल्या बारला लायब्ररीमध्ये रुपांतरीत करणार का असा थेट प्रश्नच त्यांनी विचारला आहे.

आदित्य जोशी

Smriti Irani : स्मृती इराणींच्या कुटुंबाकडून चालवल्या जाणाऱ्या गोव्यातील वादग्रस्त सिली सोल्स कॅफे अँड बारचं प्रकरण सध्या कोर्टात आहे. मात्र या हॉटेलविरोधात सातत्याने आवाज उठवणारे माहिती अधिकार कार्यकर्ते अॅड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी स्मृती इराणींना पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या आवाहनाला जागत स्मृती इराणी आपल्या बारला लायब्ररीमध्ये रुपांतरीत करणार का असा थेट प्रश्नच त्यांनी विचारला आहे.

आयरिश रॉड्रिग्ज यांनी पुढे म्हटलंय की, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोमंतकीयांना त्यांचे बार बंद करुन त्याचं लायब्ररीमध्ये रुपांतर करण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला जागून एका जबाबदार राजकारण्याप्रमाणे स्मृती इराणी आपल्या सिली सोल्स बारचं लायब्ररीमध्ये रुपांतर करणार का असा प्रश्न रॉड्रिग्ज यांनी उपस्थित केला आहे. दारुपेक्षा लायब्ररी हे वैचारिक खाद्य असून फास्ट मनीपेक्षा लोकांना शिक्षित करण्याचं साधन असल्याचंही रॉड्रिग्ज यांनी म्हटलं आहे.

सिली सोल्स कॅफेच्या अवैध बांधकामाचा मुद्दा लवकरच सिद्ध होण्याच्या मार्गावर आहे. केवळ स्मृती इराणीच नाही तर इतरही बेकायदा काम करणाऱ्या राजकारण्यांच्या संपत्तीची माहिती उघड होणं आवश्यक असल्याचं आयरिश रॉड्रिग्ज यांनी म्हटलं आहे. आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना लोकांना न्याय आणि कायद्याचे नियम माहित झाले पाहिजेत. तसंच आपल्या मासे, फेणी आणि पर्यटनाच्या भूमीत सीबीआय, ईडी आणि आयकर विभागासारख्या तपास यंत्रणांची पावलं पडू नयेत आणि गोव्याचं पावित्र्य अबाधित राहावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 'दक्ष'ची गरुडझेप! परिस्थितीशी झुंज देत गाठलं यश, आता ध्येय 'सीए' होण्याचं, पण आर्थिक मदतीची प्रतीक्षा

Handshake Controversy: 'हॅन्डशेकसाठी आम्ही भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुमपर्यंत गेलो', सलमान अली आगाचा खुलासा; क्रिकेट विश्वाचं वेधलं लक्ष VIDEO

Goa Crime: पोलिस कोठडीत मारहाणीमुळे तरुणाची आत्महत्या, वाळपई तणाव; पोलीस उपनिरीक्षकावर कारवाईसाठी कुटुंबीय आक्रमक

नेपाळच्या 'दीपेंद्र'चा मोठा धमाका! सलग दोनदा 6 चेंडूत 6 षटकार ठोकल्यानंतर आता वनडेत रचला अनोखा इतिहास; गोलंदाजांची उडवली दाणादाण

Goa Drug Case: राहत्या घरी 'गांजा'ची शेती! थिवीच्या रहिवाशाला कोर्टानं सुनावली सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा; सव्वाचार वर्षे चालला खटला

SCROLL FOR NEXT