AIRBNB|Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Airbnb च्या ग्राहकांची गोव्याला पसंती, पर्यटनावर खर्च केले 1400 कोटी रुपये

Goa Tourism: भारतात AirBnB च्या ग्राहकांनी गोव्याला सर्वाधिक पसंती दिली आहे. त्यानंतर बेंगळुरू, दिल्ली, मुंबई आणि मनालीचा क्रमांक लागतो.

Ashutosh Masgaunde

AIRBNB customers spent Rs 1400 crore on tourism in Goa in one year:

ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या नवीन अभ्यासातून असे समोर आले आहे की, भारताच्या पर्यटन उद्योगात Airbnb महत्त्वाची भूमिका बजावत आहे. एकट्या 2022 मध्ये, Airbnb ने भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात 7200 कोटी रुपयांपेक्षा जास्त योगदान दिले आहे.

यामध्ये Airbnb च्या ग्राहकांनी भारतात पर्यटनासाठी गोव्याला पंसती दर्शवत, गोव्यात अर्थिक वर्ष 2022 मध्ये पर्यटनावर तब्बल 1400 कोटी रुपये खर्च केले आहेत.

गोव्यात पर्यटकांनी खर्च केले 1480 कोटी रुपये

भारतात AirBnB च्या ग्राहकांची सर्वाधिक उपस्थिती गोव्यात होती, जिथे AirBnB ग्राहकांनी पर्यटनावर तब्बल 1480 कोटी रुपये खर्च केले आहे. त्यानंतर बेंगळुरू, दिल्ली, मुंबई आणि मनालीचा यामध्ये क्रमांक लागतो.

देशभरातील देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी Airbnb च्या ग्राहकांचे उल्लेखनीय योगदानही या अहवालातून समोर आले आहे. 2022 मध्ये Airbnb वर देशांतर्गत पर्यटकांनी 5260 कोटी रुपये खर्च केले आहेत. हे भारतातील Airbnb ग्राहकांच्या एकूण खर्चाच्या 82 टक्के आहेत. आणि 2019 च्या तुलनेत हे तिप्पट आहेत.

स्थानिक व्यवसायांच्या विकासाला वेग

Airbnb च्या भारत, आग्नेय आशिया, हाँगकाँग आणि तैवानमधील व्यवसायाचे जनरल मॅनेजर असेलेले अमनप्रीत बजाज म्हणाले, "भारतातील Airbnb च्या उद्योगाच्या योगदानाचा GDP आणि रोजगारांमधून अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे, ज्यामुळे दुकाने, रेस्टॉरंट, बार आणि कॅफे यांसारख्या व्यवसायांना मदत झाली आहे. स्थानिक व्यवसायांच्या विकासाला वेग आला आहे. पर्यटकांना एखाद्या ठिकाणाचा कसा अनुभव येतो यात हे स्थानिक लोक महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत."

ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार

अमनप्रीत बजाज पुढे म्हणाले, “प्रवास अधिक वैविध्यपूर्ण झाला आहे आणि म्हणूनच त्याचे आर्थिक फायदे आता अधिक गंतव्यस्थानांपर्यंत पोहोचत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागला आहे. या विविधतेला Airbnb वरील ग्राहकांनी चालना दिली आहे आणि विविध समुदायांसाठी आर्थिक संधी निर्माण केल्या आहेत."

"आता भारतातील जवळपास सर्वच स्थळांवर पर्यटकांचे आगमन होऊ लागले आहे, आम्ही पर्यटन अर्थव्यवस्थेला न्याय्य, सर्वसमावेशक आणि शाश्वत पद्धतीने बळकट करण्यासाठी सरकार आणि समुदायांसोबत भागीदारी करण्यास वचनबद्ध आहोत," असेही बजाज यांनी सांगितले.

देशांतर्गत पर्यटकांचे योगदान

ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सचे आशियातील आर्थिक सल्लागार संचालक जेम्स लॅम्बर्ट म्हणाले की, “Airbnb हे देशाच्या प्रवास आणि पर्यटन उद्योगाला आकार देणार्‍या काही ट्रेंडच्या केंद्रस्थानी आहे. यामध्ये शहरांपासून दूर आणि अधिक ग्रामीण भागात पर्यटन आणि दीर्घ-मुक्कामाच्या सहलींच्या मागणीत वाढ झाली आहे."

लॅम्बर्ट पुढे म्हणाले,“गेल्या तीन वर्षांत देशांतर्गत पर्यटक, पर्यटन क्षेत्राच्या लवचिकतेसाठी महत्त्वपूर्ण ठरले आहेत. कारण भारतीय पर्यटकांना आंतरराष्ट्रीय सुट्ट्यांचा पर्याय म्हणून देशांतर्गत प्रवासाच्या संधी मिळाल्या आहेत, सेल्फ-ड्राइव्ह आणि प्रादेशिक सहलींची लोकप्रियता वाढली आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT