Airbnb: अमेरिकन कंपनीचा भारतीय अर्थव्यवस्थेला बूस्टर! 85 हजार तरुणांसाठी उघडली नोकरीची दारे,

Airbnb: कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर भारतीय प्रवास आणि पर्यटन क्षेत्राच्या लवचिकता आणि पुनर्जन्मात Airbnb ने स्पष्टपणे मोठी भूमिका बजावली आहे.
American company Airbnb has opened job doors for 85 thousand Indian youth.
American company Airbnb has opened job doors for 85 thousand Indian youth.Dainik Gomantak
Published on
Updated on

American company Airbnb has opened job doors for 85 thousand Indian youth:

भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देत, पर्यटन आणि हॉस्पीटीलिटी क्षेत्रातील दिग्गज अमेरिकन कंपनी Airbnb ने सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) मध्ये 7,200 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. तसेच 2022 मध्ये सुमारे 85,000 नोकऱ्यांही उपलब्ध करून दिल्याचे, ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या एका नवीन अभ्यासात समोर आले आहे

अहवालानुसार, अमेरिकन कंपनीने भारताच्या पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कोविड-19 चा उद्रेक आणि आंतरराष्ट्रीय सीमा निर्बंध असूनही 2019 पासून भारतातील GDP योगदान आणि नोकऱ्या दुप्पट झाल्या आहेत.

Airbnb च्या ग्राहकांकडून केल्या जाणाऱ्या खर्चाचा स्थानिकांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामाचे चित्र देखील अहवालात उघड झाले झाले आहे.

2022 मध्ये Airbnb ग्राहकांनी वाहतूक, रेस्टॉरंट्स आणि रिटेल स्टोअर्स यासारख्या क्षेत्रांमध्ये एकूण 6400 कोटी रुपये खर्च केले. 2022 मध्ये airbnb च्या ग्राहकांचा हा खर्च 2019 पेक्षा दुप्पट आहे.

भारतात, Airbnb ची उपस्थिती गोव्यात सर्वात जास्त होती, जिथे Airbnb च्या ग्राहकांनी जवळजवळ 1400 कोटी रुपये खर्च केले, त्यानंतर बंगलोर आणि दिल्ली, मुंबई आणि मनाली यांचा क्रमांक लागतो.

हे देशभरातील देशांतर्गत पर्यटनासाठी Airbnb ग्राहकांनी केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचे तपशीलवार वर्णन करते. 2022 मध्ये, देशांतर्गत Airbnb ग्राहकांचा खर्च एकूण 5,260 कोटी रुपये होता आणि भारतातील एकूण Airbnb ग्राहकांच्या खर्चाच्या अंदाजे 82 टक्के आहे. यामध्ये 2019 च्या तुलनेत सुमारे तीन पटीने वाढ झाली आहे.

American company Airbnb has opened job doors for 85 thousand Indian youth.
Kevin McCarthy: 234 वर्षांच्या इतिहासात प्रथमच असा प्रकार, अमेरिकन संसदेचे स्पीकर मॅकार्थी यांची हकालपट्टी

या अहवालात कोविड-19 महामारीनंतर (कोरोना) पर्यटन क्षेत्रातील दोन महत्त्वाचे बदलही उघड झाले आहेत. प्रथम, कोविड-19 महामारीनंतर, पर्यटन शहरी भागातून दुर्गम भागात वळले आहे. दुसरे म्हणजे, वर्क फ्रॉम होमच्या व्यवस्थेमुळे, दीर्घकालीन मुक्काम करणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे.

ऑक्सफर्ड (Oxford) इकॉनॉमिक्ससाठी आशियातील आर्थिक सल्लागार संचालक जेम्स लॅम्बर्ट म्हणाले की, कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर भारतीय प्रवास आणि पर्यटन क्षेत्राच्या लवचिकता आणि पुनर्जन्मात Airbnb ने स्पष्टपणे मोठी भूमिका बजावली आहे.

American company Airbnb has opened job doors for 85 thousand Indian youth.
Microsoft CEO Satya Nadella यांचा सर्च इंजिन वर्चस्वावरून गुगलवर हल्ला, सरकारच्या बाजूने दिली साक्ष

या अहवालात मार्च २०२३ पूर्वीचे १२ महिने समाविष्ट आहेत. या वेळेत संपूर्ण भारतातून प्रवासी निर्बंध उठवले जाऊ लागले होते. अहवालात मार्च 2023 सह मागील 12 महिन्यांच्या डेटाचे विश्लेषण केले आहे, ज्याचा 2022 असा उल्लेख आहे.

ही आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झाल्यापासून पूर्ण वर्षांची आकडेवारी आहे. अहवालात, अभ्यासाच्या वेळेच्या आधारे डॉलर आणि रुपयाचा विनिमय दर विचारात घेण्यात आला आहे आणि ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या डेटाचा वापर करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com