खासगी रेन्टल कंपनी एअर बीएनबी (Airbnb) आणि गोवा पर्यटन खात्याने (Goa Tourism Department) पर्यटकांसाठी 'रिडिस्कव्हर गोवा' हा अनोखा उपक्रम लॉन्च केला आहे. येत्या डिसेंबरमध्ये पर्यकांना याअंतर्गत गोव्यातील पर्यटनाची खास आणि अगदी वेगळ्या पद्धतीने अनुभूती घेता येणार आहे. उपक्रमाच्या एक आठवड्याच्या काळात गोव्यातील मनमोहक समुद्र किनारपट्टी आणि गोव्यातील नाईटलाईफचा अनुभव घेता येणार आहे.
गोव्यातील स्थानिकांच्या मदतीने हे खास पर्यटन पॅकेज तयार करण्यात आले आहे. 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत 'रिडिस्कव्हर गोवा' हा पर्यटन कार्यक्रम पार पडेल. यात वीसहून अधिक विविध गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये गोव्यातील विविध खाद्यपदार्थ, पोर्तुगीज संगीत यांचा समावेश असणार आहे. तसेच, ज्या पर्यटकांना गोवा एक्सप्लोर करायचा आहे त्यांना गोव्यातील बाह्य सौंदर्याचा देखील अनुभव घेता येईल. याशिवाय गोव्यातील अविस्मरणीय होम स्टेचा अनुभव घेता येईल.
"अशा प्रकारचे उपक्रम गोवा पर्यटनासाठी फायदेशीर आहेत. यामुळे गोव्यातील पर्यटनाची माहिती लोकांपर्यत पोहचते. तसेच, गोव्यातील होम स्टे व्यावसायिकांना याचा आर्थिक लाभ देखील होतो. होम स्टे व्यावसायात महिलांचे प्रमाण अधिक आहे. या व्यावसायमुळे गोव्यातील दुर्गम भागातील नागरिकांना आर्थिक मदत होते." असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.