Sadanand Shet Tanavade And Murlidhar Mohol Dainik Gomantak
गोवा

Goa London Flight: अहमदाबाद क्रॅशनंतर बंद झालेली एअर इंडियाची गोवा - लंडन विमानसेवा पुन्हा सुरु होणार, बुकिंग सुरु; वाचा वेळापत्रक

Goa London Air India Flight: अहमदाबाद येथील क्रॅशनंतर कंपनीने गोवा ते लंडन थेट विमानसेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याची घोषणा केली.

Pramod Yadav

पणजी: अहमदाबाद - गुजरात येथे एअर इंडिया विमानाच्या अपघातानंतर बंद करण्यात आलेली गोवा ते लंडन (गॅटविक) विमानसेवा पुन्हा सुरु होणार आहे. आठवड्यातून तीन दिवस ही विमानसेवा सुरु राहणार आहे. राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी याबाबत माहिती दिलीय. नागरी उड्डाण खात्याचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन तानावडे यांनी हा विषय सोडवल्याची माहिती दिली.

अहमदाबाद येथून लंडनच्या दिशेने निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा १२ जून रोजी अपघात झाला. या अपघातात २६० नागरिकांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर कंपनीने गोवा ते लंडन थेट विमानसेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याची घोषणा केली.

यामुळे गोव्यातील पर्यटनावर त्याचा विपरित होण्याच्या भीतीने विमानसेवा पुन्हा सुरु करण्याची मागणी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील आमदार व नेते करत होते. या मागणीला अखेर यश आले असून, कंपनीने विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजप राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. तानावडे यांनी नागरी उड्डाण खात्याचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन हा विषय सोडवला आहे.

गोवा ते लंडन (गॅटविक) थेट विमानसेवा येत्या २६ ऑक्टोबर २०२५ पासून सुरु होणार असून, आठवड्यातून तीन दिवस (मंगळवार, शुक्रवार आणि रविवार) कार्यरत असेल, अशी माहिती तानावडे यांनी दिली आहे.

गोवा ते लंडन विमानसेवा सुरु करण्याबाबतचा विषय सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील आमदारांनी देखील नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात मांडला होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा विषय केंद्राकडे मांडून सोडविण्याचे आश्वासन दिले होते.

दरम्यान, खासदार तानावडे यांनी मंत्री मोहोळ यांच्याशी चर्चा करुन विमानसेवा पुन्हा सुरु होणार असल्याचे निश्चित केले आहे. तसेच, यासाठी त्यांनी मोहोळ यांचे आभार मानले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT