गोवा

Goa Politics: आठ आमदार फुटल्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी प्रभारी दिनेश गुंडूराव गोव्यात दाखल

दिनेश गुंडूराव उरलेल्या काँग्रेस आमदारांची बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा करतील.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यातील राजकीय पटलावर बुधवारी मोठी घडामोड घडली. काँग्रेसमधील तब्बल आठ आमदार भाजपमध्ये दाखल झाले असून, आता केवळ तीन विद्यमान आमदार काँग्रेसकडे उरलेले आहेत. पक्षातील प्रमुख नेते भाजपमध्ये विलीन झाल्यानंतर, उरल्या-सुरल्या काँग्रेसच्या डॅमेज कंट्रोलसाठी गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडूराव (Dinesh Gundurao) बुधवारी उशीरा रात्री गोव्यात दाखल झाले आहेत. दिनेश गुंडूराव उरलेल्या काँग्रेस आमदारांची बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा करतील.

दिनेश गुंडूराव पक्षातील प्रमुख नेते, कार्यालय प्रभारी यांची देखील भेट घेऊन चर्चा करणार आहेत. विधानसभा सदस्य तसेच पक्ष कार्यालय प्रभारी यांची भेट घेऊन बैठक घेतली जाईल. सध्या गोव्यातील परिस्थितीवर मला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. यावर मी सविस्तर भाष्य करेन. अशी प्रतिक्रिया दिनेश गुंडूराव यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

दरम्यान, दिनेश गुंडूराव यांनी काँग्रेस आमदारांनी केलेल्या बंडानंतर भाजप आणि बंडखोर काँग्रेस आमदारांवर तिखट शब्दात टिका केली. गोव्यातील जनतेने या आमदारांना काँग्रेसचे उमेदवार म्हणून मतदान केले. या आमदारांनी मंदीर, चर्च, दर्गा याठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही अशी शपथ घेतली. नेहमीच काँग्रेस सोबत राहू अशी संविधानाची शपथ देखील या आमदारांनी घेतली होती. पण, दिगंबर कामत, मायकल लोबो यांनी धोका अन् निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. असे गुंडूराव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dwidwadash Yog 2026: ग्रहांचा राजा अन् देवांचे गुरु एकत्र! 4 राशींवर होणार पैशांचा पाऊस; द्विद्वादश दृष्टी योगाचा मोठा चमत्कार

U20 Asian Cup 2027: दोन दशकांचा दुष्काळ अखेर संपला! 20 वर्षांच्या वनवासानंतर टीम इंडियाची 'एएफसी आशिया कप'मध्ये दिमाखदार एन्ट्री

Aitar Worship Traditional: 'आयतार पूजन' गोवा-कोकणची लोकपरंपरा आणि निसर्गाचं अतूट नातं!

Iran Oman New Route: ट्रम्प यांचा दावा ठरला फुसका फटाका! इराणनं ओमानसोबत हातमिळवणी करत रचला नवा 'गेम प्लॅन'; अमेरिकन जहाजे होणार जप्त?

Porvorim Gun Firing Case: पर्वरी गोळीबार प्रकरण; पोलिसांना चकवा देणारे 'ते' नेमके आहेत तरी कुठे? गोवा पोलिसांची 'स्पेशल टीम' उत्तर-पश्चिम भारतात रवाना

SCROLL FOR NEXT