Mario Gallery Torda event Dainik Gomantak
गोवा

फोटो द्या आणि कलात्मक चित्र मिळवा! गोव्यात सुरू झालाय 'मारियो मिरांडा'च्या शैलीत स्वतःचं चित्र बनवून देणारा उपक्रम

Mario Miranda style AI art Goa: गोव्याचे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार मारियो मिरांडा यांच्या कलेचा अनुभव आता एका नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घेता येणार आहे

Akshata Chhatre

Ai sketch event Goa: गोव्याचे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार मारियो मिरांडा यांच्या कलेचा अनुभव आता एका नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घेता येणार आहे. त्यांच्या मूळ व्यंगचित्रांचा अमूल्य खजिना जतन करणाऱ्या आर्ट गॅलरीने एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मॉडेल तयार केलेय जे मिरांडा यांच्या खास शैलीची हुबेहूब प्रतिकृती आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने आता लोकांना स्वतःची छायाचित्रे मिरांडा यांच्या शैलीतील व्यंगचित्रांमध्ये रूपांतरित करून घेता येणार आहेत.

कसं काम करतं हे तंत्रज्ञान?

हे तंत्रज्ञान 'डीप लर्निंग' (Deep Learning), 'स्टाइल ट्रान्सफर' (Style Transfer) आणि 'जनरेटिव्ह मॉडेलिंग' (Generative Modelling) यांसारख्या आधुनिक तंत्रांचा वापर करतं. मारियो मिरांडा यांच्या व्यंगचित्रांमधील नाजूक रेषा, शेडिंग आणि त्यांच्या चित्रांची मजेदार रचना ओळखण्यासाठी हे AI मॉडेल खास प्रशिक्षित केले गेलेय. 'मारियो गॅलरी'च्या क्युरेटर जेरार्ड दा कुन्हा यांनी सांगितले की, "हे तंत्रज्ञान परिपूर्ण बनवण्यासाठी जवळपास तीन महिने लागले."

कला जतन करण्याचा अनोखा प्रयत्न

हे तंत्रज्ञान केवळ मनोरंजनासाठी नाही, तर मिरांडा यांच्या कलेचा वारसा जतन करण्यासाठी आणि तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. येणाऱ्या काळात या तंत्रज्ञानाचा वापर सांस्कृतिक क्षेत्रात कसा केला जाऊ शकतो, याचे हे एक उत्तम उदाहरण बनलेय. मिरांडा यांच्या हाताच्या स्ट्रोक्स आणि कलाकृतीतील नमुन्यांची नक्कल करणारे क्लिष्ट अल्गोरिदम वापरून, प्रत्येक पोर्ट्रेटला हाताने काढलेल्या चित्रासारखीच झलक दिली जाते.

कधी आणि कुठे सुरू होणार ही सुविधा?

ही अभिनव सुविधा शनिवार दि. २३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता, तोर्डा येथील मारियो गॅलरीत सुरू केली जाईल. पर्यटक आणि अभ्यागत तिथे आपले फोटो किंवा सेल्फी सबमिट करू शकतात आणि अवघ्या काही क्षणांत त्यांना मारियो मिरांडा यांच्या खास शैलीतील AI द्वारे तयार केलेले स्वतःचे व्यंगचित्र मिळेल.

मारियो मिरांडा: कलेचा एक महान वारसा

मूळचे गोव्यातील लोटली येथील असलेले मारियो मिरांडा हे गोव्याचे जीवनमान, शहरातील गर्दी आणि उपरोधिक व्यंगचित्रांसाठी जगप्रसिद्ध आहेत. 'द टाइम्स ऑफ इंडिया' आणि इतर प्रमुख वृत्तपत्रांसाठी ते नियमितपणे व्यंगचित्रे काढत असत. कलेच्या क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना पद्मविभूषण, भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या कामाला आंतरराष्ट्रीय स्तरावरही खूप प्रशंसा मिळाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VHT 2025-26: विजय हजारे ट्रॉफीचा थरार! मुंबई-दिल्लीसह 8 संघ सज्ज; पाहा उपांत्यपूर्व फेरीचं संपूर्ण वेळापत्रक

Mardol: सफर गोव्याची! तळीजवळ गेल्यावर स्वच्छ, थंड हवा फुफुस्सांत पसरते; निसर्गसंपन्न 'म्हार्दोळ'

Madhav Gadgil: पर्यावरणाचा प्रखर प्रहरी, पश्चिम घाटांचे शिल्पकार डॉ. माधव गाडगीळ काळाच्या पडद्याआड

Vijay Hazare Trophy: गोव्याची झुंज अपयशी! 'विजय हजारे ट्रॉफी'त महाराष्ट्राचा 5 धावांनी विजय, ऋतुराजची शतकी खेळी पडली 'महागात'

eSakal Comscore: मराठी मीडियात 'ई-सकाळ'चा डंका! 19.5 मिलियन युजर्ससह ठरली देशातील नंबर वन वेबसाइट

SCROLL FOR NEXT