Goa News: गोव्याला पावसाने झोडपले, माझे घर योजना; वाचा राज्यातील ठळक बातम्या

Today's Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी मराठीमध्ये
Goa Rain Update
Goa Rain UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

वन हक्क कायदा 2006 दाव्यांवर निर्णय, उत्तर गोवा जिल्हास्तरीय समितीची बैठक

वन हक्क कायदा, २००६ अंतर्गत प्राप्त झालेल्या दाव्यांवर निर्णय घेण्यासाठी उत्तर गोवा जिल्हास्तरीय समितीची बैठक उत्तर गोवाचे डीएम अंकित यादव, आयएएस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सत्तारी तालुक्यातील कोपर्डे, मालपण आणि साटरे या गावांमधील एकूण ४३ दाव्यांवर निर्णय घेण्यात आला. ४३ दाव्यांपैकी २९ दावे मंजूर करण्यात आले, ०३ दावे उपविभागीयस्तरीय समितीकडे परत पाठवण्यात आले आणि ११ दावे डुप्लिकेट असल्याने नाकारण्यात आले.

"पोलिसांविरुद्ध काहीही खपवून घेणार नाही"

पोलिसांविरुद्ध काहीही खपवून घेतले जाणार नाही: टिकम सिंग वर्मा, एसपी दक्षिण गोवा

विहिरीत पडलेल्या महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना यश

कुंभारवाडा- पाळी येथे विहिरीत पडलेल्या महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात फोंडा अग्निशमन दलाचे अधिकारी सुशील मोरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांना आले यश.

... आणि मांजरीने घेतला छत्रीचा आसरा!

वाळपई बसस्थानकाच्या सार्वजनिक शौचालयाची परिस्थिती पहा...

"माझे घर" योजना सप्टेंबरपासून लागू - मुख्यमंत्री

राज्य सरकारतर्फे अंमलात आणलेली माझे घर योजना येत्या.सप्टेंबर महिन्यापासून लागू होणार आहे. त्यासाठी लोकांनी आपल्या घरांची कागदपत्रे तयार करून सादर करावी. गोव्यातील लोकांच्या घरांना संरक्षण देण्यासाठी हि योजना अंमलात आणली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.

वाळपईत वाहतूक कोंडी

वाळपई शहरात बेशिस्त पार्किंगमुळे वारंवार होतेय वाहतूक कोंडी

८ आमदारांच्या अपात्रता याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी शक्य

काँग्रेसमधून आमदारकीचा राजीनामा न देता भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ८ आमदारांच्या अपात्रता याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी शक्य. कॉग्रेस नेते गिरीश चोडणकर हे याचिकादार

मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई-ठाण्यात मुसळधार. शालनना सुट्टी जाहीर

क्रूझ पर्यटनातून मुरगाव बंदर 4.8 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवते

राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांनी संसदेत माहिती दिली की क्रूझ भारत अभियानांतर्गत, ऑक्टोबर २०२४ ते जून २०२५ दरम्यान, मुरगाव बंदराने ६७,५९४ प्रवाशांसह ३८ क्रूझ कॉल हाताळले, ज्यामुळे ४.८२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. पर्यटन, आतिथ्य आणि स्थानिक व्यवसायांना बळकटी देण्यावर लक्ष केंद्रित करून २०२९ पर्यंत ४ लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट या मोहिमेत आहे.

गोव्यातील फसवणूक प्रकरणात सिंगापूरच्या रहिवाशाला अटक!

बनावट कागदपत्रे आणि धमक्या देऊन बनावट “Digital Arrest” घोटाळ्याद्वारे एका शिवोलीच्या महिलेची १ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. गोवा सायबर क्राइम पोलिसांनी दिल्ली विमानतळावर आरोपीचा माग काढला आणि त्याला गोव्यात आणले. पैशांचा माग काढण्यासाठी तपास सुरू आहे.

सावर्शे सत्तरी येथे मुख्य रस्त्यावर आंब्याचे झाड पडून रस्ता वाहतुकीस बंद

वाळपई फोंडा मार्गावरील सावर्शे सत्तरी येथे मुख्य रस्त्यावर आंब्याचे झाड पडून रस्ता वाहतुकीस बंद. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com