Biometric Attendance  Dainik Gomantak
गोवा

Panchayat Attendance: गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी होणार AI चा वापर! गैरप्रकार टाळण्यासाठी उचलले पाऊल

Biometric attendance in goa panchayat: कोणत्याही पंचायतीतील कर्मचाऱ्यांची हजेरी कुठूनही अधिकाऱ्यांना पाहता येईल अशी व्यवस्था केली जात आहे.

Sameer Panditrao

पणजी: तीन दिवसात घर दुरुस्तीची मंजुरी हा निर्णय सरकारने घेतल्यापासून पंचायत कार्यालयातील सचिव व कर्मचाऱ्यांची अनुपस्थितीचे किस्से सरकारपर्यंत पोचू लागले आहेत. यामुळे आता पंचायत कर्मचाऱ्यांसाठी अत्याधुनिक पद्धतीने हजेरी लावण्याची सोय केली जात आहे.

पंचायत संचालनालयाकडून गोवा इलेक्ट्रॉनिक्स लि. या सरकारी कंपनीकडे हे काम सोपवण्यात आले आहे. त्यानुसार हजेरी नोंद करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारीत प्रणाली विकसित करण्यात येत आहे. कोणत्याही पंचायतीतील कर्मचाऱ्यांची हजेरी कुठूनही अधिकाऱ्यांना पाहता येईल अशी व्यवस्था केली जात आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित रिअल-टाइम उपस्थिती व्यवस्थापन प्रणाली सुरू करणार आहे. या उपक्रमाचा उद्देश कर्मचाऱ्यांची उपस्थिती चेहराचिन्ह ओळख प्रणालीच्या माध्यमातून तपासणे आहे, ज्यामुळे गैरप्रकार रोखले जातील आणि नागरिकांना सेवा पुरवण्याची प्रक्रिया सुलभ होईल.

गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ेही राज्याची प्रमुख माहिती तंत्रज्ञान संस्था, या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी पार पाडणार आहे. सरकारच्या निर्देशानुसार, जेल ही संपूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे, ज्यामध्ये अंमलबजावणी संस्था निवडणे, प्रकल्प नियोजन, वितरण आणि एकूण देखरेख यांचा समावेश आहे. या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारीत प्रणालीचा वापर ॲड्राईड,आयओएस आणि वेब प्लॅटफॉर्मवर होणार आहे, ज्यामुळे ती विविध उपकरणांवर उपलब्ध होईल आणि दूरस्थ ठिकाणाहून रिअल-टाइम निरीक्षण शक्य होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गैरप्रकार टाळण्यावर भर

सरकारने अलीकडेच या प्रकल्पासाठी तांत्रिक कंपन्यांना सहभागी होण्यासाठी देकार मागवले आहेत. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश पारंपरिक उपस्थिती नोंद प्रणाली जसे की कागदी रजिस्टर आणि बायोमेट्रिक फिंगरप्रिंट स्कॅनर यांना चेहराचिन्ह ओळख तंत्रज्ञानाने बदलणे आहे. ही प्रणाली “बडी पंचिंग” म्हणजेच एक कर्मचारी दुसऱ्या कर्मचाऱ्याची उपस्थिती नोंदवणे, हा गैरप्रकार टाळण्यासाठी विशेषतः उपयुक्त ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: ..परत पावसाचे टेन्शन! वेधशाळेने दिला 'यलो अलर्ट'; गोव्यात कोसळणार जोरदार सरी

Skoch Awards: अभिमान! गोव्‍याला 7 ‘स्कोच’ पुरस्‍कार जाहीर; अनुकरणीय कामगिरीबद्द्ल प्रोत्साहन

Goa Drugs: चिंताजनक! गोव्यात गेल्‍या 7 महिन्यांत 52 जणांचा ड्रग्समुळे मृत्यू, 775 जणांना अटक; विद्यार्थ्यांपर्यंत पोचली पाळेमुळे

Rama Kankonkar: मास्टरमाईंड जेनिटोच की अन्‍य कोणी? गोव्यात चर्चेला उधाण; 'काणकोणकर' हल्लाप्रकरणी संशयितांना कोर्टात करणार उभे

Rashi Bhavishya 23 September 2025: नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील, संयमाने काम करा;आर्थिक बाबतीत निर्णय काळजीपूर्वक घ्या!

SCROLL FOR NEXT