Goa Trip Scam Dainik Gomantak
गोवा

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Goa Scam: सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.

Sameer Amunekar

अहमदाबाद: सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. अशाच एका सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्यात एका अहमदाबादमधील नामांकित वकिलाला तब्बल २० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम गमवावी लागली आहे.

एका तरुणीने स्वतःला ‘थेरपिस्ट’ असल्याचे भासवून या वकिलाला गोव्याला फिरायला बोलावले आणि तिथे त्यांच्या खासगी क्षणांचे गुपचूप व्हिडिओ रेकॉर्ड करून त्याला ब्लॅकमेल केले. या प्रकरणी पीडित वकिलाने अहमदाबादच्या एलिसब्रिज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पीडित वकिलाची काही दिवसांपूर्वी एका तरुणीशी सोशल मीडियावर ओळख झाली. तिने स्वतःची ओळख एक थेरपिस्ट म्हणून दिली. दोघांमध्ये बोलणे वाढले आणि मैत्री झाली. या मैत्रीचा फायदा घेत त्या तरुणीने त्याला भेटण्यासाठी गोव्याला येण्याची ऑफर दिली. सुरुवातीला वकिलाने टाळाटाळ केली; पण तिने केलेल्या आग्रहमुळे तो तयार झाला.

दोघेही गोव्‍यातील एका हॉटेलमध्ये थांबले. त्या तरुणीने त्याच्या परवानगीशिवाय आणि त्याला कोणतीही कल्पना न देता त्यांच्या खासगी क्षणांचे व्हिडिओ गुपचूप रेकॉर्ड केले.

काही दिवस घालवल्यानंतर दोघेही आपापल्या घरी परतले. त्यानंतर काही दिवसांनी त्या तरुणीने वकिलाला ते रेकॉर्ड केलेले व्हिडिओ पाठवले. तिने ते व्हिडिओ सोशल मीडियावर आणि त्याच्या मित्रांना पाठवण्याची धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या वकिलाने तिने सांगितल्याप्रमाणे तिला पैसे द्यायला सुरुवात केली. तिने वारंवार पैशांची मागणी केल्‍याने त्‍याने पोलिसांत धाव घेतली. हा प्रकार २०२२मधील, ज्‍याची आता तक्रार झाली.

फसवणुकीचे गुन्हे वाढले

देशातील विविध राज्यांतून गोव्यात आणून अनेकांना फसविण्याचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. समाज माध्यमांवरून ओळखीद्वारे तरुणांना फसविण्याचे जणू सत्रच सध्या सुरू झाले आहे.

उघड होणाऱ्या प्रकरणांमधून बोध घेणे आवश्यक असल्याचे पोलिस आवाहन करत आहेत. काही महिन्यांपूर्वी बार्देशमध्ये असेच काही प्रकार उघडकीस आले होते. लुबाडणूक होत असल्यास पोलिसांशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT