State Level Tribal Sports Festival 2023
State Level Tribal Sports Festival 2023 Dainik Gomantak
गोवा

Tribal Sports Festival 2023 : सरकारकडून खेळासाठी चांगल्या सुविधा : कृषिमंत्री रवी नाईक

दैनिक गोमन्तक डिजिटल

पूर्वीच्या काळी क्रीडा क्षेत्रात मर्यादित संधी होत्या, पण आता राज्य सरकारने खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम आखले असून आदिवासी कल्याण खात्याच्या माध्यमातून या समाजातील मुलांनी आपला उत्कर्ष साधावा, असे आवाहन कृषिमंत्री रवी नाईक यानी केले.

कुर्टी-फोंडा येथील क्रीडा संकुलात आठव्या आदिवासी क्रीडा महोत्सवाचे उद्‍घाटन रवी नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रीडामंत्री गोविंद गावडे, क्रीडा व युवा व्यवहार खात्याचे संचालक रोहित कदम, गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालक डॉ. गीता नागवेकर, प्राधिकरणाचे प्रशिक्षण संचालक ब्रुनो कुतिन्हो, प्रज्योत चोडणकर आदी उपस्थित होते.

कृषिमंत्री रवी नाईक म्हणाले, की ‘‘आदिवासी समाजाने पोर्तुगीज राजवटीत आणि नंतरच्या काळातही खूप सोसले आहे, आता या समाजातील मुले पुढे येत आहेत, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध योजना आणि उपक्रम आखत असून क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अशा योजना उपलब्ध होत असल्याने त्याचा लाभ समाजातील मुलांनी घ्यावा व आपले जीवन उज्ज्वल करावे.’’ शिस्तीने वागा आणि खडतर प्रयत्न करून यश संपादन करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले, की ‘‘संकटांवर मात करण्याची जिद्द प्रत्येकाने बाळगायला हवी. एखाद्या ध्येयप्राप्तीसाठी अडचणी अनेक येतील, संकटे समोर उभी ठाकतील, पण घाबरायचे नाही. आपल्याला जे ध्येय साध्य करायचे आहे, त्याच्या पाठीमागे लागायचे आणि जीवनात सफलता गाठायची. शिस्त ही महत्त्वाची असून कोणत्याही क्षेत्रात जर तुम्हाला यशस्विता गाठायची असेल तर शिस्तीत वागा आणि आपले जीवन समृद्ध करा.’’

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप नाईक व आत्मानंद पेडणेकर यांनी केले, गीता नागवेकर यानी स्वागत व प्रास्ताविक केले, तर क्रीडा खात्याचे अधिकारी नवीन आचार्य यांनी आभार मानले.

प्रतिभाशाली क्रीडापटूंचा गौरव

आदिवासी क्रीडा महोत्सवात राज्यातील आदिवासी समाजाच्या विविध क्रीडा प्रकारांत यश मिळवलेल्या प्रतिभाशाली खेळाडूंचा गौरव करण्यात आला. रॉलिन बोर्जिस (फुटबॉल), अंकिता गावडे (बेसबॉल), दीपक गावकर (खो-खो), दीपेश जल्मी (मल्लखांब), नितीन सावंत (व्हॉलिबॉल) सर्वेश गावडे (टेनिस बॉल क्रिकेट), साईश गावडे (कबड्डी) या खेळाडूंना शाल, स्मृतिचिन्ह आणि पाच हजार रुपये असा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

राज्यभरातील पावणे दोन हजार खेळाडू

राज्यभरातील पावणे दोन हजार खेळाडूंनी या आदिवासी क्रीडा महोत्सवात भाग घेतला आहे. राज्यातील बाराही तालुक्यातून या क्रीडा महोत्सवाला उत्साही प्रतिसाद लाभला. इतर खेळांबरोबरच देशी लंगडी, खो खो आणि कबड्डीसह इतर खेळही या क्रीडा महोत्सवात घेण्यात आले. खात्याच्या प्रशिक्षकांनी आणि इतरांनी क्रीडा महोत्सव आयोजनासाठी उत्तम सहकार्य केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रादो 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT