Goa Farming Dainik Gomantak
गोवा

Goa Farming: गव्यांकडून शेतीचे नुकसान

Goa Farming: शेतकरी हैराण : देवाबाग-काणकोण येथील प्रकार

दैनिक गोमन्तक

Goa Farming:

तारेचे कुंपण असताना गव्यांकडून शेताची नासाडी होत असल्याने देवाबाग येथील शेतकरी प्रेमानंद विठोबा बांदेकर हे हैराण झाले आहेत. वन विभागाने या गव्याचा बंदोबस्त करावा तसेच नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बांदेकर यांनी केली आहे.

बांदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार देवाबाग येथे आपण भात शेती रोवली असून पूर्ण शेताभोवताली तारेचे कुंपण उभारले आहे. तरीही रात्रीच्यावेळी शेताची नासाडी होत असल्याने पाहून आपण रात्री पाळत ठेवली असता तारेच्या कुंपणावरून उडी घेउन शेतात गवा चरताना आढळला.

गेली पन्नास वर्षे मी शेतीचा व्यवसाय करीत आहे. मात्र कधीच गव्याने शेतात घुसून नासाडी केली नव्हती. शेती लागवडीसाठी आतापर्यंत सुमारे दीड लाख रुपये खर्च करण्यात आला आहे, परंतु गव्यामुळे पूर्ण मेहनत व पैसा पाण्यात गेला आहे, असे ते म्हणाले.

वन विभाग उपयोजना करणार : वायंगणकर

वन खात्याने या गव्याचा बंदोबस्त करावा. तसेच कृषी खात्याने नुकसानीची पाहणी करून भरपाई द्यावी अशी मागणी बांदेकर यांनी केली. यासंदर्भात क्षेत्रीय वनाधिकारी नारायण वायंगणकर यांना विचारले असता या संदर्भात अजून तक्रार आलेली नाही, तरीही चौकशी करून योग्य उपाययोजना करण्यात येईल, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

Sexual Harassment Case: मनोरंजन विश्वात खळबळ! 'महाभारत' फेम 'भीम' सौरव गुर्जरला अटक; लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली 14 दिवसांची कोठडी

SCROLL FOR NEXT