Goa Politics: भाजपच्या दोन्ही उमेदवारांबाबत आता समाजमाध्यमांवर अपप्रचार

Goa Politics: भाजप उमेदवार लक्ष्य : कार्यक्षमतेसोबत विविधप्रश्‍नी सोशल मीडियावर पत्रके
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics:

भाजपने उत्तर गोव्यातून केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांना तर दक्षिण गोव्यातून उद्योजिका पल्लवी धेंपे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्‍हणजे या दोन्ही उमेदवारांबाबत आता समाजमाध्यमांवर अपप्रचार सुरू झाला आहे.

साहजिकच या दोन्ही उमेदवारांच्या प्रतिमा डागाळू न देण्याचे आव्हान भाजपसमोर उभे ठाकलेय. भाजपकडे समाजमाध्यमे हाताळणारी तगडी फौज असतानाही या दोन्ही उमेदवारांविरोधातील पत्रके व्हॉटस-ॲपच्या ग्रुपच्‍या माध्यमातून फिरू लागली आहेत. विशेष म्‍हणजे त्‍यातील काही पत्रके विदेशात जाऊन तेथून ती परत गोव्यात आली आहेत.

भाजपकडून दक्षिण गोव्याची उमेदवारी महिलेला दिली जाणार असे संकेत मिळाल्यावर पक्षसंघटनेतील सक्रिय असलेल्या एखाद्या महिला नेत्याचा विचार केला जाईल, असे सगळ्यांनाच वाटत हते.

Goa Politics
Goa Shigmotsav 2024: डिचोलीत मुलांसह महिलांनी लुटला रंगपंचमीचा आनंद

मात्र पक्षसंघटनेच्या परिघाबाहेर असलेल्या पल्लवी धेंपे यांच्या नावाचा विचार पक्षाने उमेदवारीसाठी केला. त्यांच्याविरोधात टीका करण्यासाठी विरोधकांना लगेच मुद्दे सापडणार नाहीत असे भाजपला कदाचित वाटले असावे.

मात्र याला छेद देत १२ तासांतच धेंपे यांच्यावर टीका करणारे पत्रक जारी करण्यात आले. त्या जोडीला श्रीपाद यांच्या कार्यक्षमतेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण करणारे पत्रक व्‍हायरल झाले. अद्याप भाजपने या पत्रकांची दखल घेत त्यांना अधिकृतपणे उत्तर दिलेले नाही.

Goa Politics
Holi 2024: उत्तर गोवा उमेदवार श्रीपाद नाईक यांनी लुटला रंगपंचमीचा आनंद

प्रचाराला आजपासून प्रारंभ

भाजप उमेदवार श्रीपाद नाईक आणि पल्लवी धेंपे यांच्या प्रचाराची अधिकृत सुरूवात उद्या दुपारी 3.30 वाजता पणजीची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन केली जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्‍थित असतील.

पल्लवी आज करतील पहिले भाषण

भाजपकडून उद्या मंगळवारी सायंकाळी पणजीतील श्री महालक्ष्मी मंदिर परीसरात एका छोट्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि दोन्ही उमेदवारांची भाषणे होणार आहेत. पल्लवी धेंपे यांचे राजकारणी म्हणून ते पहिले भाषण असेल. दरम्‍यान, पल्लवी यांचा मतदारसंघ दौरा बुधवारी सुरू होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com