Destroyed cashew nuts 
गोवा

केरी-सत्तरीत गव्याकडून शेतीचे नुकसान

Dainik Gomantak

पर्ये, : केरी-सत्तरी येथे गव्यांचा हैदोस सुरूच असून काल रात्री गादोवाडा येथील रघुनाथ माजिक यांच्या शेताला असलेली काट्याच्या तारेचे कुंपण मोडून भेंडी लागवड व काजूच्या कलमांची नासधूस केली आहे.
मोर्ले गडाच्या पायथ्याशी असलेल्या या परिसरात गव्यांचा हैदोस ही नित्याची बाब झाली आहे. गवे व इतर जनावरांकडून नासाडी होऊ नये, म्हणून रघुनाथ माजिक यांनी आपल्या शेताला काटेरी तारेचे सहा फूट उंच कुंपण केले होते. पण या काटेरी कुंपणाची पर्वा न करता गवेच्या कळपाने हे कुंपण एका ठिकाणी जमीनदोस्त करून आत शिरले आणि ही नुकसान केली. यात रघुनाथ माजिक, गौतमी माजिक व गुरुदास माजिक यांची भेंडी शेती व काजूची कलमे तर नारायण माजिक यांची सुमारे २० काजूच्या कलमांची नासाडी केली आहे. यामुळे त्यांना मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गव्यांनी येथील भेंडीचे पिक खाऊन फस्त तर काजूची कलमे उन्मळून टाकली. काजुची कलमे ३-४ वर्षाची लागवडीची असल्याने त्याचा त्यांना मोठा फटका बसला आहे.

वनखात्याचे कर्मचारी फिरलेच नाही दरम्यान, आज या घटनेची माहिती संबंधित शेतकऱ्यांनी वनखात्याला देण्यासाठी केरी राऊंड फॉरेस्टर कार्यालयात गेले असता वनखात्याचे वनरक्षक अथवा अन्य कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते. त्यानंतर त्यांनी चौकशी केली असता आज रविवार सुटी असल्याने कोण नाही, असे कारण पुढे आले. पण त्यांनी केरी वन क्षेत्राचे क्षत्रिय वन अधिकारी विवेक गावकर यांच्याशी संपर्क साधला असता वनरक्षक येऊन शेतीची पाहणी करणार आणि रात्रीच्या वेळी ही त्यांची गस्त असणार. पण संध्याकाळ पर्यंत कोणीही वनरक्षक घटनास्थळी पोहचले नसल्याचे श्री. माजिक यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांकडून वनखात्याच्या या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

नुकसान भरपाईची मागणी दरम्यान, गव्यांकडून झालेल्या नुकसानाची भरपाई करण्याची मागणी सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. कष्ट करून शेती करावी आणि जंगली प्राण्यांनी त्याची नासधूस करावी, यामुळे शेतकरी हवालदिल बनला असून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी ही भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: माजी पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नीला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, अर्थमंत्र्याला रस्त्यावर पळवून दिला चोप; नेपाळमधील भयावह व्हिडिओ पाहा

Akshay Kumar Property: मॉरिशस, कॅनडा आणि गोव्यात आलिशान व्हिला... 2,500 कोटींची संपत्ती आणि गाड्यांचा ताफा; 'अशी' आहे बॉलीवूडच्या 'खिलाडी'ची जीवनशैली

आमका आयआयटी नाका! कोडार येथे प्रकल्प नको म्हणून ग्रामस्थ एकवटले Watch Video

IIT Goa: 'गोव्यात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करण्याची सवय लागलीय...'; प्रस्तावित आयआयटीवरुन मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा विरोधकांवर प्रहार

Gold Price: सोन्याच्या दरांनी मोडले सगळे रेकॉर्ड! एकाच दिवसात तब्बल 'इतक्या' हजारांची वाढ, 10 ग्रॅम सोन्याचा भाव पुन्हा 1 लाख पार

SCROLL FOR NEXT