Goa Mission Rebies Dainik Gomantak
गोवा

Goa Mission Rebies: गोव्याच्या 'मिशन रेबीज'साठी एडिनबर्ग विद्यापीठासोबत करार; इतर देशही राबवणार हे मॉडेल

2018 पासून राज्यात रेबीजचा एकही रूग्ण नाही

Akshay Nirmale

Goa Mission Rebies: गोवा राज्य रेबीजमुक्त घोषित करण्यात आले असून 2018 पासून राज्यात रेबीजचा एकही रुग्ण आढळलेला नाही. तथापि, गोव्याच्या सीमाभागातून कुत्रे गोव्यात प्रवेश करत असल्याने रेबीज विषाणूचा धोका मात्र, राज्यात कायम आहे.

गोव्याच्या सीमाभागात कुत्र्यांवर पाळत ठेवण्यासाठी, मिशन रेबीजने एडिनबर्ग विद्यापीठाशी कुत्र्यांचा मागोवा घेणारी यंत्रणा बसवण्यासाठी करार केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

मिशन रेबीजचे शिक्षण संचालक, डॉ. मुरुगन अप्पुपिल्लई यांच्या हवाल्याने या वृत्तात म्हटले आहे की, "किती कुत्रे सीमेवरून जात आहेत याचा अंदाज येण्यासाठी जंगल भागातील झाडांवर आणि परिसरातील कुत्र्यांच्या मानेवर सेन्सर बसवले आहेत. हे सेन्सर एडिनबर्ग विद्यापीठाने स्थापित केले आहेत.

राज्याच्या सीमेवरून दररोज 10 ते 15 कुत्रे गोव्यात येतात. 20 ते 30 टक्के कुत्रे परत जातात, तर 60 ते 70 टक्के कुत्रे गोव्यात स्थायिक होतात. कुत्री अन्नाच्या शोधात तर काही कुत्री वीणीच्या हंगामासाठी येतात राज्यात प्रवेश करतात.

कोविड महारोगराईकाळात आणि लॉकडाऊन दरम्यान, अनेक कुत्रे अन्नाच्या शोधात गोव्यात आले आणि त्यावेळी रेबीजची प्रकरणे जवळपास 25 पर्यंत वाढली, जी तीनवर आणली होती. वर्षाच्या अखेरीस, या अभ्यासात एकत्रित केलेल्या वैज्ञानिक डेटाचा अहवाल प्रसिद्ध केला जाईल.

अप्पुपिल्लई यांनी सांगितले की, रेबीजमुक्तीसाठी गोवा हे भारतातील उर्वरीत राज्यांसाठी आदर्श राज्य आहे. गोव्याची ही यशोगाथा इतर देशांमध्येही नेली जात आहे. भटक्या कुत्र्यांची गंभीर समस्या असलेल्या नेपाळ, इंडोनेशिया आणि भूतान या देशांमध्ये प्रशिक्षण दिले आहे.

11 दक्षिण आशियाई देशांना एका आठवड्याचे प्रशिक्षण दिले गेले आहे. त्या देशांमध्येही मोहिम सुरू होईल. याशिवाय भारतातील शहरांमधील तज्ज्ञांना मिशन रेबीजच्या स्वयंसेवकांद्वारे प्रशिक्षित केले जात आहे.

मुंबई, बेंगळुरू, पुद्दुचेरी आणि केरळ यांच्याशी गोव्याचे मॉडेल राबवण्याबाबत सामंजस्य करार होणार आहेत.

जागितक आरोग्य संघटनेनेने 2030 पर्यंत रेबीज नष्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या अनुषंगाने G20 बैठकीसाठी गोव्यात आलेल्या केंद्रीय पशुसंवर्धन आयुक्तांना गोव्याच्या मिशन रेबीज मॉडेलचे अनुकरण इतर राज्यांनी करावे, यासाठी सर्व राज्यांना पत्र लिहिण्याचे आवाहन केले.

आम्ही प्रशिक्षण, सल्लामसलत आणि तंत्रज्ञान मोफत देण्यास तयार आहोत, असे अप्पुपिल्लई यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT