Agonda Village panchayat Dainik Gomantak
गोवा

Agonda Village panchayat : आगोंदच्या सरपंच फातिमा रॉड्रिग्स पायउतार; कारण गुलदस्त्यातच !

पंचायत संचालनालयास राजीनामा सादर : पदासाठी तिघे उत्सुक

दैनिक गोमन्तक डिजिटल

आगोंदच्या सरपंच फातिमा रॉड्रिग्स यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा 29 एप्रिल रोजी, पंचायत संचलनालयाला सादर केलेला असून तो संमत होण्याची प्रतीक्षा या पंचायतीच्या 7 पैकी सरपंचपदासाठी इच्छुक तिघा पंचसदस्यांना आहेत.

पर्यटन व्यवसायामुळे ही पंचायत सध्या सोन्याची अंडी देणारी कोंबडी बनली आहे. असे असताना सरपंचांनी राजीनामा देणे हे स्थानिकांसाठी न सुटणारे कोड‌ बनलेले आहे. गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पांच पंचसदस्य एकत्र येऊन प्रथम फातिमा रॉड्रिग्स यांची सरपंचपदी निवड केली होती. तर उपसरपंचपदी प्रितल फर्नांडिस यांची निवड झाली होती.

स्थानिक आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांच्या मदतीने गेल्या एका वर्षात 6 वीज ट्रान्सफॉर्मर बसवून वीजपुरवठा सुरळीत करणे, पार्वे ते मुडकूड हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात आले होते, तसेच वाल तोवऱ्यामळ भागात मोबाईल टॉवर व पाण्याची चांगली व्यवस्था केली होती.

पातेल ते गुरावळ पर्यंत नदीतील गाळ उपसा काम सुरू केले आहे. आगोंद भागातून प्रथमच ही पंचायत भाजपकडे आणण्यात सभापती तवडकर यांना शक्य झाले होते. आगोंद पंचायतीच्या सरपंचपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत पंचायत क्षेत्रातील ग्रामस्थांत जोरदार चर्चा सुरू आहे.

अवैध घर क्रमांकप्रकरणी ‘आरटीआय’

प्राप्त माहितीनुसार एका माजी सरपंचाने वाल तोवऱ्यामळ येथील अनधिकृत घरांना घर क्रमांक दिल्याप्रकरणी आरटीआय अंतर्गत माहिती मागितली आहे. हे प्रकरण यापुढे कदाचित वेगळे वळण घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आगोंद पंचायत क्षेत्रात अवैध बांधकामे सुरू असून धवळखाजन -पार्वे भागात एक मोठी इमारत अवघ्या ६ महिन्यात उभी राहिल्याचा आरोप होत आहे. वाल, काराशीरमळ, पार्वे आदी कोमुनिदादच्या जागेत 78 अवैध घरांवर कारवाईची टांगती तलवार असल्याच्या पार्श्वभूमीवर सरपंच रॉड्रिग्स यांची कसोटीच लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ronaldo Goa Visit: फुटबॉलप्रेमींचा हार्टब्रेक! अल नासर गोव्यात दाखल; ख्रिस्तियानो रोनाल्डो अनुपस्थित, चाहते नाराज

Narkasur Chor: गोव्यात 'नरकासुरच पळवला'!! भल्या पहाटे दुचाकीवरून नेला चोरून, व्हिडीओ पाहून हसू आवरेना; Watch Video

Pakistan ODI Captain: पाकिस्तान क्रिकेट क्षेत्रात खळबळ! रिजवानची केली हकालपट्टी; 'या' आक्रमक गोलंदाजाच्या हाती दिले नेतृत्व

Goa Politics: "आम्हाला कोणी बोलावलंच नाही",फातोर्डा मेळाव्यावर पालेकरांचा खुलासा; 'आप'शिवाय विरोधी पक्षांची एकजूट?

Sancoale Theft: गोव्यात आणखी एक मोठी चोरी, सांकवाळ येथे फ्लॅट फोडला; 8.5 लाखांचे दागिने, महागडी घडयाळे लंपास

SCROLL FOR NEXT