Agniveer Scheme  Gomantak Digital Team
गोवा

Agniveer Scheme : वास्को येथे भारतीय नौदल सेनेची परेड

272 महिलांनी ओडिसा येथील भारतीय नौदल सेनेच्या ‘चिल्का’ या पोर्टलवरून यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को : भारतीय नौदलाच्या एकूण 2,585 अग्निवीरांनी (272) महिला) ओडिसा येथील भारतीय नौदल सेनेच्या ‘चिल्का’ या पोर्टलवरून यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्यांची पासिंग आउट परेड करण्यात आली.

दक्षिण नौदल कमांडने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला चीफ ऑफ नेव्हल स्टाफ ॲडमिरल आर. हरिकुमार, व्हाईस ॲडमिरल एम.ए. हमपिहोली, खासदार पी.टी. उषा, क्रिकेटपटू मिताली राज तसेच तज्ज्ञ नौदल अधिकारी वर्गाने उपस्थिती लावून परेडचा आढावा घेतला.

यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत अग्निवीरांना पदक व चषक प्रदान करण्यात आले. अमलाकांती जयराम, अजित पी. यांना पुरुष गटात अनुक्रमे सर्वोत्कृष्ट अग्निवीर एसएसआर व एमआरसाठी नौदल फिरता करंडक आणि सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. खुशी (अग्निवीर-एसएसआर) सर्वोत्कृष्ट महिला ठरली. एक रोलिंग ट्रॉफी, दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या व्हिजनच्या स्मरणार्थ ठेवण्यात आली आहे. ती रावत यांच्या मुलीने खुशीला प्रदान केली.

यशस्वी झालेल्यांनी त्यांचे कौशल्य आणखी वाढवावे, ज्ञानाचा पाया मजबूत करावा, शिकण्याची इच्छा आणि त्यांच्या पुढील करिअरमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची वचनबद्धता विकसित करावी. राष्ट्रउभारणीसाठी नौदलाच्या कर्तव्य, सन्मान, धैर्य या मूलभूत मूल्यांचे पालन करण्याची गरज आहे.

- आर. हरिकुमार, चीफ ऑफनेव्हल स्टाफ ॲडमिरल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

SCROLL FOR NEXT