At the press conference  Dainik Gomantak
गोवा

'प्रकल्‍प रद्द होईपर्यंत गोव्यात आंदोलन राहणार सुरूच'

गोंयचो एकवोट: तीन रेषीय प्रकल्प पर्यावरणास मारक

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: गोव्यातील नियोजित तीन रेषीय प्रकल्प पर्यावरणाचा ऱ्हास करणारे आहेत. जोपर्यंत हे प्रकल्प रद्द केले जात नाहीत तोपर्यंत त्याविरोधातील आमचे आंदोलन सुरूच आहे, असा इशारा ‘गोंयचो एकवोट’ या संघटनेने दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने रेल्वेमार्ग दुपदरीकरण कामाला चाप लावण्याचा निर्णय काल दिला आहे, त्याचे संघटनेने स्वागत केले आहे. आतातरी सरकारने केंद्रावर दबाव आणून हे प्रकल्प रद्द करावेत अन्यथा आम्हाला त्यासाठी पुन्हा रस्त्यावर यावे लागेल असे संघटनेचे निमंत्रक कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी आज मडगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी संघटनेचे ऑलेन्‍सियो सिमॉईश, शंकर पोळजी, एला मास्कारेन्हस व इतर सदस्य उपस्थित होते.

रेल्वे मार्ग दुपदरीकरण, तन्‍मार वीज प्रकल्प व राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण हे तिन्ही प्रकल्प कोळसा वाहतुकीसाठी आहेत. तसेच ते पर्यावरणदृष्टीने हिताचे नाहीत. त्‍यामुळे सर्वोच्च न्‍यायालयाच्‍या निर्णयाचे आम्‍ही स्‍वागत करतो, असे फर्नांडिस म्‍हणाले. कोरोनाचा काळ सुरु असताना सरकारने षडयंत्र रचून पडद्यामागून या प्रकल्पांचे काम सुरू केले होते. गोव्याची जनता कोरोनाच्या भीतीने घरात असताना या प्रकल्पांना चालना देण्यात आली. यादरम्यान गोव्यातील काही संघटनांनी संघटित होऊन आंदोलनेही केली. शेवटी न्यायालयात धाव घ्यावी लागली. यापुढेही आमचा लढा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT