Aggressive senior citizen over diversion of bus at Pernem station Dainik Gomantak
गोवा

आता पेडणेकर गप्प बसणार नाहीत! पेडणे स्थानकावर बस वळवण्यावरून ज्येष्ठ नागरिक आक्रमक

Kavya Powar

Aggressive senior citizen over diversion of bus at Pernem station

राजधानी पणजीतून निघणाऱ्या आंतरराज्य एसटी बसेस पेडणे बसस्थानकावर न थांबता महाराष्ट्रात जातात त्यामुळे पेडणे राहिवाश्यांना मालपे थांब्यावर उतरून दुसऱ्या वाहनाने पेडण्यात यावे लागते.

त्यामुळे या गाड्या पेडणे बसस्थानकावर वळवाव्यात, असे निवेदन पेडणेकरांनी उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांना दिले आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू असल्याने पेडणे तालुक्यातील हा मार्ग मालपे गावातून थेट बंद रोडला जोडला गेला असल्याने पेडणे शहर बायपास होते. त्यामुळे महाराष्ट्रात जाणाऱ्या एसटी पेडणे बसस्थानकावर जात नाहीत. या गाड्या बाहेरच्या बाहेरच निघून जातात.

कणकवली वाहतूक नियंत्रकांनी देवगड, मालवण, कणकवली तसेच सिंधुदुर्ग या भागातून गोव्यात येणाऱ्या गाड्यांना पेडणे बसस्थानकावर जाण्याचे आदेश दिले गेलेले असूनही, या गाड्या पेडण्यात येत नाहीत. शिवाय गोव्यातील वाहतूक नियंत्रक यांची दखल घेत नसल्याचे पेडणेकरांचे म्हणणे आहे.

तसेच पेडणे शहराच्या मध्यभागी आणि बाजार परिसरात बेशिस्त वाहने उभी करून ठेवत असल्याने रहदारी आणि पादचाऱ्यांना त्रास होतो. त्यावर वाहतूक नियंत्रकांनी वेळीच कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गोव्यातून सिंधुदुर्ग तसेच महाराष्ट्रातील इतर भागात जाणाऱ्या गाड्या जर पेडणेमार्गे वळविल्या गेल्या नाहीत तर आता पेडणेकर गप्प बसणार नाहीत. येत्या 7 सप्टेंबरपासून आपण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा पेडण्यातील ज्येष्ठ नागरिकांनी दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: ख्रिस्ती समाजाच्या मोर्चाचा वाहतुकीला फटका; अनेकांची गैरसोय

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

SCROLL FOR NEXT