Sugar  Dainik Gomantak
गोवा

Goa Government : तूरडाळीप्रमाणे साखरेचीही नासाडी; चौकशीचे आदेश

गोव्यात संतापाची लाट; कानावरील हात आता कारवाईसाठी पुढे

दैनिक गोमन्तक

Goa Government : राज्यातील गोदामांमध्ये पडून असलेल्या 242 मेट्रिक टन तूरडाळीची नासाडी उघडकीस आली होती. यानंतर सरकारवर चौफेर टीका सुरू आहे. त्यातच आता डाळीपाठोपाठ 10.3 मेट्रिक टन साखरही खराब झाल्‍याचे समोर आले आहे. त्‍याची विल्‍हेवाट लावण्‍यासाठी नागरी पुरवठा खात्‍याने 28 जुलैला निविदा काढली आहे. डाळ नासाडी प्रकरणी प्रथमत: कानावर हात घेणाऱ्या प्रशासनाला कारवाईसाठी जबाबदारी नक्‍की करावी लागणार असून दक्षता खात्‍याला चौकशीचे आदेश देण्‍यात आल्याची माहिती मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी दिली.

याबाबत अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे संचालक गोपाळ पार्सेकर म्हणाले, कोरोना काळात जुलै 2020 च्या दरम्यान राज्य सरकारच्या नागरिक पुरवठा खात्याद्वारे राष्ट्रीय कृषी को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (नाफेड) महाराष्ट्र विभागाकडून 83 रुपये प्रति किलो दराने 400 मेट्रिक टन खरेदी करून 12 गोदामात ठेवली होती. दरम्यान, लॉकडाऊन लागल्यामुळे डाळ वाटपावर मर्यादा राहिल्या. त्यानंतर स्वस्त धान्य दुकानदारांना ही डाळ नागरिकांना वाटप करण्यासाठी पाठवण्यात आली. लोकांनी ती नाकारली. त्यामुळे 400 टनापैकी 158 मेट्रिक टन डाळ संपली. परंतू, 242 डाळ विविध ठिकाणच्या 12 गोडाऊनमध्ये पडून राहिली.

समोर आलेले धक्कादायक वास्‍तव

1 डाळ खराब झाल्‍याची बाब आठ महिन्यांपूर्वी प्रशासनाच्या लक्षात आली. त्‍यानंतर प्रशासनाने याबाबत जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी सातत्याने चालढकल केली.

2 या प्रकरणाची उलगड्यासाठी आरोग्य सचिव राजशेखर यांची नियुक्ती केली. मात्र, त्यांनीही याबाबत सखोल चौकशी केलीच नाही. आता डाळ पूर्णतः खराब झाल्याचे लक्षात आल्यानंतर ती डाळ नष्ट करावी लागणार आहे.

3 नागरी पुरवठा खात्याने यापूर्वी निविदा काढली होती. परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून पुन्हा दुसऱ्यांदा या डाळीची विल्हेवाट लावण्यासाठी नागरी पुरवठा खात्याकडून निविदा काढण्यात आली आहे. यामुळेच हे प्रकरण उघडकीस आले.

4 हे प्रकरण गंभीर वळणावर आले असून सरकार जागे झाले आहे. सरकारने प्रकरण दक्षता खात्याकडे पाठवले आहे. तसेच कारवाई व दोष निश्चित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

डाळीबाबत मागितले होते स्पष्टीकरण

तत्कालीन नागरी पुरवठा खात्याच्या संचालकांना सडलेल्या डाळीविषयी स्पष्टीकरण मागितले होते, त्यांनी तेही दिले नसल्याची सूत्रांनी सांगितले. 2021-22 च्या महालेखापालांनी केलेला अहवाल पुढील वर्षी बाहेर येईल. परंतु ज्या काही खात्यांची तपासणी झाली आहे, त्यातील नागरी पुरवठा खात्यातील तूरडाळीच्या साठ्याविषयी विचारणा करण्यात आली आहे, असेही समजले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 2nd Test: पहिला विजय झाला, आता मालिका विजयाची 'हुकमी तयारी'! दुसरा सामन्याचे सर्व डिटेल्स एका क्लिकवर वाचा

Haryana Crime: तोकडे कपडे आणि चारित्र्यावर संशय... 18 वर्षीय भावाने बहिणीची बॅटने मारहाण करुन केली हत्या; हरियाणातील संतापजनक घटना!

Formula 4 Racing In Goa: गोव्यात होणार प्रतिष्ठीत 'फॉर्म्युला- 4 रेस'; गोमंतकीयांना अनुभवता येणार जागतिक रेसिंग स्पर्धेचा थरार

टीसींना 'बॉडी कॅमेऱ्यांचे' कवच! खोट्या विनयभंगाचे आरोप रोखण्यासाठी होतेय मागणी, तिकीट नसताना टीसीशी हुज्जत घालणाऱ्या महिलेचा Video Viral

Goa Congress: 'भाजप का काँग्रेसविरोधात लढायचंय ठरवा'; भूमिका स्पष्ट करण्याचा माणिकराव ठाकरेंचा 'आप'ला सल्ला

SCROLL FOR NEXT