Gangwar in Colvale Jail  Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail: गॅंगवॉरनंतर कोलवाळ कारागृहात महानिरीक्षकांची धाड! 'या' गोष्टी केल्या जप्त

तब्बल 30 मोबाईल फोन्स जप्त केले असून तंबाखूजन्य इतर गोष्टीही ताब्यात घेतल्या आहेत

दैनिक गोमन्तक

Gangwar in Colvale Jail : नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असलेल्या कोलवाळ कारागृहात 30 मे ला दोन टोळ्यांमध्ये गॅंगवॉर झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी ताबडतोब तुरुंग अधिकारी कारागृहात दाखल झाले होते, तर परिस्थिती बघता म्हापसा आणि कोलवाळ पोलीस स्थानकातून अतिरिक्त पोलीस फोर्सही बोलावण्यात आले होते. त्या प्रकरणातील आता नवी माहिती समोर आली आहे.

परवाच्या घटनेनंतर पुन्हा एकदा तुरुंग प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर काल (गुरुवार) रात्रीच्या वेळी महानिरीक्षकांनी कोलवाळ कारागृहात छापा टाकला.

यामध्ये त्यांनी तब्बल 30 मोबाईल फोन्स जप्त केले असून तंबाखूजन्य इतर गोष्टीही ताब्यात घेतल्या आहेत. यामुळे, कैद्यांना या गोष्टी मिळतातच कशा? असा सवाल पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी या कारागृहात अट्टल गुन्हेगार अश्‍पाक बेंग्रे तसेच कारबोटकर यांचा खून झाला होता. त्यावेळी झालेल्या टोळीयुद्धामध्ये कारागृहातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून तसेच कारागृहात काळोख करून बेदम मारहाण केल्याने त्यांच्या मृत्यू झाला होता.

या कारागृहात तेथील साधनसुविधा वापरण्यावरून दोन टोळ्यांमध्ये वाद आहेत. त्यामुळे त्यांच्यात असे वारंवार खटके उडत असतात. तुरुंगाधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी करून दोन्ही गटांना ताकीद दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT