Sankhali Municipal Elections 2023 Dainik Gomantak
गोवा

Sankhali Municipal Elections 2023: साखळीमध्ये राजकीय घडामोडींना वेग

सगलानी गटाचे 2 नगरसेवक भाजपच्या वळचणीला

गोमन्तक डिजिटल टीम

Sankhali Municipal Elections 2023: साखळी नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना बराच वेग आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा हा बालेकिल्ला असल्याने त्यांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

त्यांनी सत्ताधारी ‘टूगेदर फॉर साखळी’ या सगलानी गटातील दोन आजी-माजी नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले आहे.

मुख्यमंत्री सावंत यांच्या मतदारसंघात साखळी नगरपालिका येत असल्याने राजकीयदृष्ट्या त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. येथील 12 प्रभागांसाठी 5 मे रोजी मतदान होणार आहे, तर 18 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत.

या पार्श्वभूमीवर साखळीतले राजकीय वातावरण तंग झाले असून फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे.

सत्ताधारी सगलानी गटाचे राया पार्सेकर आणि रियाज खान या दोन आजी-माजी नगरसेवक फोडण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले असून आणखी कुणाला भाजपमध्ये यायचे असेल तर त्यांच्यासाठी दरवाजे खुले आहेत, असे जाहीर आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

त्यामुळे आणखी कुणी भाजपमध्ये येऊ इच्छितात, त्यांच्यासाठी हे आवाहन आहे. साखळी शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून यंदा साखळी पालिकेवर आमचा दणदणीत विजय होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

50 टक्के नवे उमेदवार

अजूनही ज्यांना भाजपमध्ये यायचे आहे, त्यांच्यासाठी दरवाजे खुले आहेत, असे सांगत यंदा 50 टक्के उमेदवार नवे असतील, असे आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले.

लवकरच भाजपचे 12 उमेदवार जाहीर करण्यात येतील. यासंदर्भात चर्चा, गुप्त बैठकांना वेग आला आहे. त्यातच उमेदवारांची पळवापळवीही होताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AI Market: अमेरिकेला मागे टाकून भारत बनणार AI ची सर्वात मोठी बाजारपेठ; चॅटजीपीटीच्या CEO चं मोठं वक्तव्य

Train Robbery: कोकण रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई! प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू लाटणारा सराईत चोरटा जेरबंद; 12.57 लाखांचा मुद्देमाल जप्त

Goa Assembly Session: मर्दनगडावर उभारण्यात येणार संभाजी महाराजांचे स्मारक, गडाच्या संरक्षणाचा मार्ग मोकळा; सरकारने दिले ठोस आश्वासन

Priyansh Arya Century: 7 चौकार, 9 षटकार! श्रेयस अय्यरच्या जोडीदाराचा धमाका, प्रियांश आर्याने ठोकले धमाकेदार शतक; नावावर केला नवा रेकॉर्ड

Raksha Bandhan Wishes in Marathi: राखीच्या धाग्यात गुंफलेलं मायेचं नातं... रक्षाबंधननिमित्त भावा-बहिणीच्या नात्यातील जिव्हाळा वाढवणारे 'या' खास शुभेच्छा संदेश

SCROLL FOR NEXT