power supply Gomantak Digital Team
गोवा

Valpoi Electricity Issue: नगरगाव युवकांच्या आक्रमकतेनंतर रातोरात वीजपुरवठा झाला सुरळीत!

वारंवार समस्‍या : सत्तरीत वीज बंच केबल सेवा ठरलीय फुसका बार

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi Electricity Issue: सत्तरी तालुक्‍यातील नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रात वीजपुरवठा वारंवार खंडित होण्‍याचे प्रकार घडत आहेत.

काल मंगळवारी सायंकाळी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रात्री कोदाळ, माळोली, बांबर, धावे आदी भागातील युवकांनी वाळपई वीज कार्यालयावर धडक दिली व तेथील अधिकाऱ्यांना जाब विचारला.

त्‍यांनी शेवटपर्यंत जिद्द सोडली नाही व अखेर रात्री एक-दीड वाजता नगरगाव कोदाळ रस्त्यावर आंब्याचे मळ भागातील बंच केबल दुरुस्ती करून आज बुधवारी पहाटे अडीच वाजता वीजपुरवठा सुरळीत करून घेतला.

बांबरचे अंकीत जोशी म्हणाले की, पूर्वी वीजतारांची सेवा चांगली होती. तीच सेवा पुन्हा सरकारने कार्यान्‍वित केली पाहिजे. बंच केबल अत्यंत कमी दर्जाची घातलेली असल्याने हे प्रकार होत आहेत. त्यावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. अशी आधुनिक बंच केबल दुरुस्ती करणारे कुशल व्यक्ती स्थानिक पातळीवर तयार होणे गरजेचे आहे.

बंच केबल नादुरुस्त झाल्यानंतर तातडीने उपाय होईल तशी कार्यवाही आवश्यक आहे. पण नगरगाव भागात तशी स्थिती नाही. कोणालाही काहीच पडलेले नाही. लोकांनी उठाव केल्यानंतरच सरकारी यंत्रणा जागी होते. लोकांनी कडक भूमिका घेतल्यानंतर रात्री अडीच वाजता वीजपुरवठा सुरू झाला. पण समस्या अजून सुटलेली नाही.

बंच केबल सेवा मुळीच नको

युवकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली. नगरगाव पंचायत भागात धावे, उस्ते, वरचावाडा धावे, बांबर, कोदाळ, साट्रे, देरोडे, माळोली आदी गावात वीज गुल झाली होती. वीज बंच केबलमध्ये वारंवारपणे होत असलेली समस्या त्यामुळे वीज गुल होण्याचे प्रकार नगरगाव पंचायत भागात वाढलेले आहेत. गेली दीड-दोन वर्षे हा प्रकार सुरु आहे. त्यामुळे लोकांनी आता वीज बंच केबल सेवा नकोच अशीच भूमिका घेतलेली आहे.

बंच केबल अत्यंत कमी दर्जाची घातलेली असल्याने असे प्रकार होत आहेत. त्यावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. अशी आधुनिक बंच केबल दुरुस्ती करणारे कुशल व्यक्ती स्थानिक पातळीवर तयार होणे गरजेचे आहे. बंच केबल नादुरुस्त झाल्यानंतर तातडीने उपाय होईल तशी कार्यवाही आवश्यक आहे.

- अंकीत जोशी, बांबर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT