Theft in Ponda Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : फोंड्यात चोरांचा सुळसुळाट; मंदिरापाठोपाठ शाळाही लुटली

फोंड्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून पोलिसांसमोर त्यांना पकडण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलं आहे.

आदित्य जोशी

Goa Crime : फोंड्यात मागच्याच आठवड्यात झालेलं चोऱ्यांचं सत्र ताजं असतानाच आता चोरट्यांनी एका शाळेवरही डल्ला मारल्याचं आता समोर आलं आहे. फोंड्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून पोलिसांसमोर त्यांना पकडण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. चोरांनी गाळवाडा, निरंकाल फोंडा येथील सरकारी प्राथमिक शाळेत चोरी केली आहे.

फोंडा तालुक्यातील गाळवाडा निरंकाल येथील सरकारी प्राथमिक शाळेत चोरी झाली आहे. चोरट्यांनी स्पीकर, प्रोजेक्टरसह देवपुजेचं साहित्य लुटत पोबारा केला आहे. हजारोंचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. आधीच पोलिसांकडून मागच्या आठवड्यात झालेल्या चोऱ्यांचा तपास पूर्ण झालेला नाही. चोरट्यांचा माग काढण्यात पोलिसांना अपयश आलं असतानाच आणखी एका चोरीने पोलिसांनाच आव्हान दिलं आहे.

दरम्यान फोंड्यात उसगाव तिस्क परिसरात चोरट्यांनी एटीएम लुटीसाठी वापरलेली कार पोलिसांनी शोधून काढली आहे. फातोर्ड्यातील वेस्टर्न बायपासवर गांधी रोडवर ही ओमनी कार पार्क केलेली पोलिसांना आढळून आली होती.

फोंडा पोलीस एटीएम लुटीच्या घटनेपासून कारसह चोरट्यांच्या मागावर होते. आता या गुन्ह्यासाठी वापरलेली ओमनी कार फातोर्डा मडगाव परिसरात पार्क केलेल्या अवस्थेत आढळली आहे. GA09 A0324 असा नंबर कारवर लिहिलेला असून पेट्रोलिंग करताना फातोर्डा पोलिसांच्या पथकातील रॉबर्ट यांना ही कार आढळून आली. लागलीच त्यांनी याची माहिती फातोर्डा पोलीस स्टेशनला दिली. फोंडा पोलिसांशी संपर्क साधून त्यांना याठिकाणी पाचारण करण्यात आलं.

तिस्क - उसगाव येथे झाली असून चोरट्यांनी एचडीएफसी आणि कॅनरा बँक अशा दोन बँकांची एटीएम रात्री पळवली. चोरट्यांनी जवळच असलेल्या कुळण येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी ही एटीएम फोडली. दोन्ही एटीएम मधून किती पैसे पळवले ते समजू शकले नाही. पोलिसांनी ही दोन्ही मशीन ताब्यात घेतली आहेत.

दुसरीकडे कुंकळ्ये - म्हार्दोळ नारायणवाडा येथे रात्री एका दुकानात शिरुन चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. दुकानदाराला संशय आल्याने त्याने धाव घेतल्याने चोरट्यांनी फ्रीजमधील बाटल्यांचा मारा त्याच्यावर केला. अखेर दुकानदाराने आरडाओरडा केल्याने आपल्या दुचाकी तिथेच सोडून चोरट्यांनी पोबारा केला आहे. तर खांडोळ्यातील प्राचीन गणेश मंदिरावर मध्यरात्री दरोडा घालून लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. मूर्तीची प्रभावळ, मुकुट, हात, एका पायाचे पाऊल, अक्षयपात्र, सूर्य, चंद्र प्रतिमा, रथाचे काही साहित्यही घेऊन चोरटे पसार झाले. या घटनेत अंदाजे 10 लाखांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT