After resigning from Aam Aadmi Party, Calangute leader Sudesh Mayekar joins BJP Dainik Gomantak
गोवा

आपला धक्का, सुदेश मयेकरांचा भाजपमध्ये प्रवेश

सुदेश मयेकरांनी आपच्या तिकिटावर कळंगुट मतदारसंघातून निवडणूक लढवली होती

दैनिक गोमन्तक

पणजी : आम आदमी पक्षाचे कळंगुट मतदारसंघाचे उमेदवार सुदेश मयेकर पुन्हा भाजपवासी झाले. माजी आमदार मायकल लोबो यांच्याशी असलेल्या राजकीय मतभेदांमध्ये त्यांनी भाजपपासून फारकत घेत आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. यानंतर त्यांनी आप’च्या (AAP) तिकिटावर कळंगुट मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना त्यात यश आले नाही. शनिवारी संध्याकाळी भाजपच्या पणजीतील कार्यालयात प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या उपस्थितीत पक्षामध्ये प्रवेश केला.

याप्रसंगी त्यांच्या कार्यकर्ते, समर्थकांनी भाजपमध्ये मोठ्या संख्येने प्रवेश केला. यावेळी तानावडे म्हणाले, मयेकर यांचे लोबो यांच्याशी असलेल्या मतभेदामुळे ते भाजपपासून दुरावले होते. आता ते पुन्हा स्वगृही परतल्याने कळंगुट (Calangute) मतदारसंघातील पक्षाची ताकद वाढली आहे. भाजपने (BJP) राज्यात पुन्हा एकदा सरकार स्थापन केले आहे. निवडणुका झाल्यापासून हा दुसरा पक्ष प्रवेश आहे. यानंतर देखील अनेक नेते भाजपमध्ये सामील होणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, ॲड. यतीश नाईक यांनी 11एप्रिल रोजी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. काँग्रेस (Congress) सोडून ते तृणमूल काँग्रेसमध्ये गेले होते. पण काही दिवसांनंतर त्यांनी तृणमूलला रामराम दिला होता. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. याला कार्यकत्यांनी देखील आपला पाठिंबा दर्शवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT