Kaavi Art 
गोवा

Kaavi Art: म्हादईनंतर कर्नाटकचा गोव्यातील कावी कलेवर डोळा, GI मानांकनासाठी केला अर्ज

Karnataka Applies for Kaavi Art GI: कर्नाटक आता कलेचा वारसा देखील चोरु पाहत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Pramod Yadav

म्हादई नदीच्या पाणी वाटपावरुन गोवा आणि कर्नाटकात वाद सुरु आहे. कर्नाटक म्हादईचे पाणी मलप्रभेत वळविण्यासाठी प्रयत्नशील असून, कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी कर्नाटक आग्रही आहे. यासाठी दोन्ही राज्यांमध्ये कायदेशीर लढाई सुरु असताना आता कर्नाटकचा गोव्यातील कावी कलेवर डोळा आहे.

आमदार विजय सरदेसाई यांनी अधिवेशानात हा मुद्दा उपस्थित केल्याने कर्नाटक आता कलेचा वारसा देखील चोरु पाहत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कर्नाटक राज्याने कावी कलेसाठी जीआय मानांकन मिळावे म्हणून अर्ज केल्याचे एक वृत्त सभागृहात दाखवत सरदेसाईंना गोवा सरकार काय करतेय असा सवाल केला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रकरणी गोवा सरकार देखील दक्ष असून त्यांच्या सरकारने देखील अर्ज केल्याची माहिती दिली. कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी याबाबत सभागृहातील सदस्यांना जशी काळजी आहे तशी सरकारला देखील काळजी असल्याचे गावडेंनी नमूद केले.

पुरातन चित्रकला प्रकार म्हणून कावी कला प्रसिद्ध आहे. पोर्तुगीजांनी गोव्यात आणलेली ही कला कोकण प्रातांतील विविध मंदिरांमध्‍ये आजही पाहायला मिळते. वैशिष्टपूर्ण माती, चुना, विशिष्ट रंगाची पाने-फुले आणि अन्य घटक एकत्र करून हे मिश्रण व्यवस्थित कुजवून, तयार झालेल्या तांबड्या रंगाच्या कावीचा वापर वास्तूंचे रंगकाम करण्यासाठी केला जातो.

कावी कलेला पुनर्जीवित करण्यासह राज्य व राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी गोमंतकीय युवा कलाकार सागर नाईक मुळे त्याच्या कलेतून करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मन की बात कार्यक्रमात सागरचे कौतुक केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT