Goa News: पोटात आढळले तब्बल नऊ किलो प्लास्टिक, दोन महीने वासराची मृत्यूशी झुंज अपयशी

Valpoi Goa: ऑपरेशन केल्यानंतर वासरु सावरेल अशी अपेक्षा होती मात्र त्या मुक्या जीवाने अखेर प्राण सोडले.
Goa News: पोटात आढळले तब्बल नऊ किलो प्लास्टिक, दोन महीने वासराची मृत्यूशी झुंज अपयशी
Calf Consumed around 9 kg Plastic died in Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

तब्बल नऊ किलो प्लास्टिक वासराच्या पोटात आढळून आले. दोन महिन्यांपूर्वी केलेल्या उपचारानंतर प्लास्टिक वासराच्या पोटातून बाहेर काढण्यात आले खरे, पण त्या मुक्या जीवाची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. नाणूस, वाळपई येथे गोसंवर्धन केंद्रात या वासराचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, २६ मे रोजी रस्तावर फिरणारे एक वासरु अस्वस्थ असल्याचे निदर्शनास आल्याने जय श्रीराम गोसंवर्धन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी वासराला उपचारासाठी गोशाळेत दाखल केले. पशुवैद्यकीय तज्ञांनी ऑपरेशन करुन वासराच्या पोटातून तब्बल नऊ किलो प्लास्टिक बाहेर काढले.

ऑपरेशनदरम्यान वासराच्या गळ्यापर्यंत प्लास्टिळ साचल्याचे दिसून आले. यामुळे त्याची पचनसंस्था पूर्णपणे बंद झाल्याचे आढळून आले. ऑपरेशन केल्यानंतर वासरु सावरेल अशी अपेक्षा होती मात्र त्या मुक्या जीवाने अखेर प्राण सोडले.

Goa News: पोटात आढळले तब्बल नऊ किलो प्लास्टिक, दोन महीने वासराची मृत्यूशी झुंज अपयशी
South Western Railway: गोवा-कर्नाटक सीमेवर भूस्खलन; दूधसागर - सोनावली रेल्वे मार्गाबाबत महत्वाची अपडेट

भारतात भटक्या जनावरांची समस्या भीषण आहे. गोव्यात देखील अनेक मोकळ्या जागेत भटकी जनावरे कळप करुन थाबंलेली दिसून येतात. भटक्या जनावरांना बऱ्याचवेळा खाण्यासाठी काही न मिळाल्याने कचरा पेटीतील किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकलेले अन्न प्लास्टिक पिशवीसहीत खाल्ले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com