Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

दिल्लीतील नेत्यांना भेटून विश्‍वजीत राणे परतले

विश्‍वजीत राणे यांनी गोवा विमानतळावर उतरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते दिल्लीला गेल्याचा त्यांनी इन्कार केला

दैनिक गोमन्तक

पणजी: आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे आज गुरुवारी संध्याकाळी आपल्या दिल्ली दौऱ्यावरून परतले. ते एका चार्टर विमानाने सकाळी दिल्लीला गेले होते. गोवा विमानतळावर उतरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आपण दिल्लीला गेल्याचा त्यांनी इन्कार केला. मी मुंबईला गेलो होतो. एवढेच ते म्हणाले.

गोवा निवडणुकीनंतर विश्‍वजीत राणे तातडीने आज सकाळी दिल्लीला गेले होते. गोव्यात भाजपा सरकार स्थापन करण्यासाठी आपण काही आमदारांच्या संपर्कात आहोत. हे त्यांनी दिल्लीला भाजप पक्षश्रेष्ठींना सांगितल्याचे वृत्त आहे.

सत्तेरी येथील राणे यांचे निकटवर्तीय सांगतात, विश्‍वजीत यांनी मुख्यमंत्री बनण्याची आपली महत्त्वकांक्षा कोणापासून लपवून ठेवलेली नाही. दोन दिवसांपूर्वी आपल्या समर्थक पंच सदस्यांशी बोलताना, आपणच मुख्यमंत्री बनणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. गोव्यात भाजपचे काही महत्त्वाचे नेते या निवडणुकीत पराभूत होतील आणि आपल्यालाच सर्वोच्च पद मिळेल असा राणे यांचा होरा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Double Murder Case: रक्ताचे नाते ठरले वैरी! दोन पोटच्या मुलांनीच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

Operation Sindoor: पाक लष्कराचे पितळ उघडे! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचाच पराभव; इम्रान खान यांच्या बहिणीच्या दाव्यानं खळबळ

Pakistan Heavy Rain: पाकिस्तानात पावसाचा हाहाकार! खैबर पख्तूनख्वामध्ये पूर अन् भिंती कोसळून 12 जणांचा मृत्यू; 5 बालकांचा समावेश

India vs Zimbabwe T20: श्रेयस अय्यरची 'अग्निपरीक्षा'! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा; पाहा संपूर्ण संघ अन् वेळ

Goa U19 cricket: आदित्य कोटा, मिहीर कुडाळकरची अर्धशतके निष्फळ; पुदुचेरीचा गोव्यावर 110 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT