Babush Monserrate | Jennifer Monserrate Dainik Gomantak
गोवा

Babush Monserrate: न्यायालयात स्वतःसह पत्नीवरील आरोप ऐकून महसूल मंत्री म्हणाले...

पणजी पोलिस स्थानक हल्ला प्रकरणी सुनावणी

Akshay Nirmale

Babush Monserrate: महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात आणि त्यांच्या पत्नी जेनिफर यांचा कथित सहभाग असलेल्या पणजी पोलिस स्थानक हल्ला प्रकरणाची सुनावणी आजपासून खास न्यायाधीश अर्शद आगा यांच्यासमोर सुरू झाली.

मोन्सेरात दाम्पत्याने आज न्यायालयात उपस्थित राहून आपल्यावरील आरोप ऐकून घेतले. ‘आपला न्यायदेवतेवर पूर्ण विश्‍वास आहे’, अशी प्रतिक्रिया बाबूश यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

२००८ साली बाबूश विरोधी पक्षाचे आमदार असताना ते समुहाबरोबर पणजी पोलिस स्थानकावर चाल करून गेले होते. त्यांनी स्थानकात मोडतोड करत पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी सीबीआयने संबंधितांवर आरोपपत्र दाखल केले होते.

आज या प्रकरणातील सुरवातीचे तपास अधिकारी असलेले पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर यांची उलटतपासणी सुरू झाली असून ती पुढे चालू राहणार आहे.

दरम्यान, या घटनेत पोलिस स्थानकासमोरील जमाव हिंसक बनून हल्लाबोल करू लागल्यानंतर काही पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना पांगवण्यासाठी स्थानकाबाहेर हवेत गोळीबार केला होता. पोलिस व जमाव यांच्यात झालेल्या धुमश्‍चक्रीवेळी एका पोलिसाकडून काडतूस हरविल्याची तक्रार दाखल झाली होती.

जमाव हिंसक बनण्यापूर्वी मोन्सेरात दाम्पत्य तेथे उपस्थित होते. त्यानंतर ते मुलाच्या चौकशीसाठी पोलिस स्थानकात आले असता त्यांना अटक करण्यात आली, अशी जबानी तक्रारदार तथा पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी न्यायालयात दिली होती.

जेव्हा पोलिस स्थानकासमोरील जमाव हिंसक बनला, दगडफेक व बाटल्या फेकण्यात आल्या, तेव्हा पोलिस व जमावातील काहीजण जखमी झाले असले तरी आपल्याला जखमी झालेल्या काही पोलिसांचीच नावे माहीत आहेत. मात्र, जमावातील कोणी जखमी झाले की नाही, याबाबत माहिती नाही, असे लोटलीकर यांनी सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT