Pilerne Fire: बर्जर पेंट कंपनीस पुन्हा काम सुरू करण्यास GSPCB चा विरोध...

गोवा राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ पुन्हा तपासणी करणार
GSPCB On Berger Paint Company Fire
GSPCB On Berger Paint Company FireDainik Gomantak
Published on
Updated on

Pilerne Fire Case: गोव्यातील पिळर्ण औद्योगिक वसाहतीतील बर्जर बेकर कोटिंग प्रा. लि. ही पेंट फॅक्टरी गेल्या महिन्यात लागलेल्या मोठ्या आगीमुळे चर्चेत आली होती. जवळपास दोन ते तीन दिवस ही आग धुमसत होती. त्यानंतर या आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले होते.

दरम्यान, आता या कंपनीने पुन्हा काम सुरू करण्यास गोवा राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाने विरोध दर्शविला आहे. त्यामुळे या कंपनीला पुन्हा पुर्ववत कामास सुरवात करता येणार नाही.

GSPCB On Berger Paint Company Fire
New Bihar Governor: गोव्याच्या राजेंद्र आर्लेकर यांनी बिहारचे 41 वे राज्यपाल म्हणून घेतली शपथ

शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने बर्जर-बेकर कंपनीच्या प्रतिनिधींकडून त्यांची बाजू ऐकून घेतली. या बर्जर-बेकर पेंट कंपनीला दि. १० जानेवारी २०२३ रोजी, भीषण आग लागली होती. ज्यात कंपनीचा अर्धा प्रकल्प जळाला होता.

सध्या घटनास्थळावरुन धोकादायक कचरा साफ करणे बाकी आहे. घातक साहित्यांची विल्हेवाट लावण्यापूर्वी कंपनीला मंडळाची परवानगी घ्यावी लागेल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या सुनावणीदरम्यान कंपनीने महामंडळासमोर पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या उपाययोजना स्पष्ट केल्या. आता प्रदूषण नियंत्रण महामंडळ या कंपनीची पाहणी करणार आहे. त्याचप्रमाणे बोर्डाने कंपनीला कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन सुरु न करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, पिळर्ण औद्योगिक वसाहतीच्या पायथ्याशी असलेल्या साळपे-कांदोळी या गावातील लोकांनी सदर कंपनी ही लोकवस्तीमधून अन्यत्र स्थलांतरीत करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांसह इतर संबंधित प्रशासकीय विभागांकडे केली आहे. त्याचप्रमाणे गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला देखील याप्रश्नी निवेदन देत आपले म्हणणे मांडले आहे.

सुमारे दोन ते तीन दिवस ही आग धुमसत होती. याबाबत अहवाल देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन केली होती. या अहवालानंतर कंपनी तिथेच सुरू ठेवायची किंवा स्थलांतरित करायची याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. विधानसभेत या आगीबाबत आमदार मायकल लोबो यांनी प्रश्न मांडला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com