Goa Railway News
Goa Railway NewsDainik Gomantak

Goa Railway News: गोव्यात वर्षभरात ट्रेनखाली चिरडून तब्बल 'इतके' मृत्यू

कोकण रेल्वे पोलिसांनी दिली माहिती
Published on

Goa Railway News: गोव्याच्या हद्दीत गेल्यावर्षी रेल्वे रुळांवर ट्रेनच्या धडकेने 59 जणांचा मृत्यू झाला आहे. 2021 वर्षाचा तुलनात्मक अंदाज घेतल्यास 46 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात गतवर्षी आणखी 13 जणांची भर पडली आहे. यातील काही जणांनी आत्महत्या केली आहे.

Goa Railway News
धक्कादायक! जपानी पर्यटकाला गोव्यात मारहाण करून 9 लाखांना लुबाडले; ट्विटरवरून शेअर केले लुटारूंचे फोटो

कोकण रेल्वे पोलीस स्थानकाकडून मिळालेल्या माहितीनुसार काणकोण ते पेडणे रेल्वे ट्रॅकदरम्यान हे अपघात घडलेले आहेत. यातील काही जणांना रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेची धडक बसली आहे. काही जणांनी आत्महत्या केली आहे. तसेच काही मनोरुग्णही रेल्वेच्या चाकाखाली आलेले आहे.

कोरोनाकाळात लॉकडाऊनवेळी 2020 मध्ये रेल्वेखाली येऊन मृत्यू झालेल्यांची संख्या केवळ 24 होती. त्यानंतर दरवर्षी त्यात वाढ होत गेली आहे.

गतवर्षी झालेल्या 59 मृत्यूंपैकी सहा आत्महत्या होत्या, 45 रूळ ओलांडताना अपघाती रेल्वेची धडक बसली होती आणि आठ जणांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला आहे. सीआरपीसी कलम 174 अन्वये कोकण रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

Goa Railway News
Carnival In Goa: गोवा कार्निव्हल फेस्टिवलला पर्वरीत सुरुवात, 'कर्टन रेझर'ला युवाईचा उत्साह

रेल्वे ट्रॅकसह रेल्वेच्या जागेवर अनधिकृतपणे अतिक्रमण करणे हा रेल्वे कायदा 1989 च्या कलम 147 नुसार दंडनीय गुन्हा आहे, कोकण रेल्वे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, बहुतेक मृत्यू दारूच्या प्रभावाखाली होतात.

आत्महत्याग्रस्तांसह रेल्वे अपघातातील बहुतांश बळी हे 30 ते 50 वयोगटातील पुरुष आहेत. ऑगस्ट 2022 मध्ये, 34 वर्षीय हवाई दलाच्या कर्मचाऱ्याने मडगाव रेल्वे स्थानकाजवळ पहाटेच्या सुमारास आत्महत्या केली होती. हा मूळचा केरळचा रहिवासी असून तो कामानिमित्त दिल्लीला गेला होता.

त्याने निजामुद्दीन-त्रिवेंद्रम एक्स्प्रेसने प्रवास केला व नंतर मडगाव रेल्वे स्थानकावर आत्महत्या केली होती. दरम्यान, रेल्वे रुळांवर होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. पायाभूत सुविधांमध्ये वाढीसह नवीन सुधारणांसाठी प्रयत्न केले जात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com