Konkan Railway  X Social Media
गोवा

Konkan Railway News: कोकण रेल्वे पुन्हा ठप्प, आता रत्नागिरीत दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

Konkan Railway News: गोव्यात मालपे बोगद्यात झालेल्या घटनेमुळे वाहतूक खोळंबल्याच्या घटनेला चार दिवस पूर्ण होत असतानाच आता रायगडमध्ये दुसरी घटना घडली आहे.

Pramod Yadav

कोकण रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झाली असून, आता रत्नागिरी विभागात दरड कोसळल्याने मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दिवाणखवटीजवळ रेल्वे रुळांवर माती आल्याने वाहतूक खोळंबली आहे. कोकण रेल्वेच्या वतीने याबाबत माहिती दिली आहे.

कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागातील दिवाणखवटी येथे रेल्वे रुळांवर मातीचा ढीगारा आल्याने वाहतूक खोळंबली आहे. सायंकळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. तीन तासांत मातीचा ढीगारा हटवून वाहतूक पूर्ववत केली जाईल, अशी माहिती कोकण रेल्वेने दिली आहे.

एक्स सोशल मिडियावर याबाबत एका युझरने माहिती दिली आहे. दिवाण खवटी नातुवाडी टनल जवळ रेल्वे रुळावर दरड कोसळली दरड दूर करण्यास किमान दोन ते अडीच तासांचा वेळ लागेल, असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.

कोकण रेल्वेच्या वतीने रुळांवर आलेली माती हटविण्याचे काम सुरु असल्याचे व्हिडिओ देखील सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहेत. माती हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, यामुळे अनेक रेल्वे गाड्यांची वाहतूक प्रभावित झाली. याचा मडगाव - मुंबई मांडवी एक्सप्रेसला देखील फटका बसला. मांडवी एक्सप्रेस गेल्या चार तासांपासून एका जागी उभी असल्याचे एका प्रवाशाने ट्विट केले आहे.

गेल्या आठवड्यात गोव्यातील मालपे - पेडणे येथील बोगद्यात चिखलमिश्रित पाणी आल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला मात्र, मुसळधार पावसामुळे या बोगद्यात पुन्हा चिखलमिश्रित पाणी यायला लागले.

मार्ग मोकळा करुन वाहतूक सुरळीत करण्यास रेल्वे प्रशासनाला सतरा तास लागले. या घटनेला चार दिवस पूर्ण होत असतानाच आता कोकण रेल्वे मार्गावर दुसरी घटना घडल्याने रेल्वे वाहतूक खोळंबली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa FDA Raid: पर्यटकांना बनवलं बनावट ग्राहक! कळंगुट-म्हापशात निकृष्ट दर्जाचे काजू, चॉकलेट जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Papmochani Ekadashi 2026: नशिबाची साथ अन् श्रीहरीचा आशीर्वाद! पापमोचनी एकादशीला उजळणार 'या' 5 राशींचं भाग्य; नोकरीत बढतीसह धनलाभाचा योग

Crime News: क्रूरतेचा कळस! दहावीच्या विद्यार्थिनीवर 5 नराधमांचा सामूहिक अत्याचार; आई लेकीला वाचवण्यासाठी धावली, पण...

मस्करीची झाली कुस्करी! बॉसला एका शब्दासाठी मोजावे लागले 29 लाख, महिला कर्मचाऱ्याला चिडवणं पडलं महागात; काय नेमकं प्रकरण?

Goa Drugs Case: अंमली पदार्थांविरोधात फातोर्डा पोलिसांचा 'ॲक्शन मोड'! 'इतक्या' हजारांच्या गांजा जप्त; 25 वर्षीय तरुणाच्या आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT