Loksabha Election 2024 RG Manifesto
Loksabha Election 2024 RG Manifesto Dainik Gomantak
गोवा

RG चे मिशन लोकसभा! सर्वात पहिल्यांदा उमेदवार जाहीर केल्यानंतर आता जाहीरनामा प्रसिद्ध; म्हादई, पोगोचा समावेश

Pramod Yadav

Loksabha Election 2024 RG Manifesto

देशात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. गोव्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून जोरदार राजकीय हालचाली सुरु आहेत. मिशन लोकसभेच्या या तयारीत प्रादेशिक रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्ष (आरजी) आघाडीवर आहे.

आरजीने लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर राज्यात सर्वात पहिल्यांदा त्यांच्याकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता पक्षाने लोकसभेसाठी जाहीरनामा देखील प्रसिद्ध केला आहे.

रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाच्या वतीने गुरुवारी (दि.15) दुपारी पत्रकार परिषद घेऊन जाहीरनामा प्रसिद्ध केला.

कित्येक दशकं उलटून गेली, संसदेत गोवेकरांचा आवाज घुमवलेला नाही. म्हादई नदी प्रवाहाचे वळण, कोळसा हब, केंद्र सरकारच्या नोकऱ्या वाटप, स्थलांतरितांचा प्रश्न आणि जमीन संरक्षण यासारख्या महत्वाच्या मुद्यांवर काँग्रेस आणि भाजपच्या निवडून आलेल्या खासदारांनी दुर्लक्ष केले आहे, असे आरजीच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे.

जाहीरनाम्यात कोणत्या मुद्यांचा समावेश

म्हादई नदीचा मुद्दा, कोळसा हबच्या स्थापनेला विरोध, गोमन्तकीयांसाठी केंद्र सरकारच्या नोकऱ्या मिळवून देणे, गोमन्तकीयांची ओळख आणि जमीन सुरक्षित करणे, स्थलांतरितांचा प्रश्न, महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरण, रोजगार, अनुसुचित जमातींच्या घटनात्मक हक्कांसाठी लढाई आणि दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा, अशा मुद्यांचा आरजीच्या जाहीरनाम्यात समावेश आहे.

गोमन्तकीय लोकांनी उमेदवारासाठी नव्हे तर गोव्याच्या भवितव्यासाठी मतदान करण्याची वेळ आल्याचे त्यांच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे.

खासदार निधीचा कौशल्य केंद्र, क्रीडा सुविधा, पिण्याचे पाणी, महिला सक्षमीकरण उपक्रमांना प्राधान्य देणे. सूक्ष्म उद्योजकांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे यासाठी विवेकपूर्ण वापर केला जाईल, असे जाहीरनाम्यात म्हटले आहे.

आरजीकडून उत्तर गोव्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा मनोज परब यांच्या नावाची घोषणा केलीय, तर दक्षिणेत रुबर्ट परेरा मैदानात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अज्ञात युवकांकडून म्हावळींगे गावात 'भू-सर्व्हेक्षण'; संतप्त गावकऱ्यांनी सर्व्हेचे काम रोखले, संशयित ताब्यात

Goa Todays Live Update: राहुल गांधींविरोधात फोंड्यात पोलिस तक्रार!

Goa Filmcity: गोवा फिल्मसिटीच्या कामासाठी सरकारी हालचाली सुरु, वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता

Goa Dam Water Level: गोव्यात चार दिवस यलो अलर्ट; कोणत्या धरणात किती पाणीसाठी?

Panjim Police: रझिया गँगच्या दोघांना गोव्यातील हॉटेलमधून अटक; चोरीचे 3.75 लाखांचे दागिने जप्त

SCROLL FOR NEXT