Eight cases of dengue were reported in Fonda, Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa: COVID-19 नंतर राज्यात डेंग्यूचे संक्रमण; फोंड्यात आठ रुग्ण

कोविड-१९ (COVID-19) च्या प्रादुर्भावानंतर आता गोव्यात (Goa) डेंग्यूने (Dengue) आपले डोके वर काढायला चालू केले आहे

दैनिक गोमन्तक

कोविड-१९ (COVID-19) च्या प्रादुर्भावानंतर आता गोव्यात (Goa) डेंग्यूने (Dengue) आपले डोके वर काढायला चालू केले आहे. (After COVID-19 pandemic, dengue hits Goa)

फोंडा तालुक्यात डेंग्यूचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. फोंडा शहर तसेच उपनगरी कुर्टी भागात पाच, शिरोडा भागात दोन तर मडकई भागात एक असे हे रुग्ण आहेत. हे सर्व रुग्ण बरे आहेत. इतरांनीही काळजी तसेच सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

फोंडा तसेच कुर्टी, शिरोडा, मडकई आदी ठिकाणी डेंग्यू वाढू नये यासाठी आवश्‍यक उपाययोजना घेण्यात आली आहे. डासांची पैदास रोखण्यासाठी आरोग्य खात्यातर्फे फोंडा-कुर्टीत फॉगिंग तसेच स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. लोकांना स्वच्छतेसंबंधी आवाहन करण्यात आले असून या मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभला असल्याचे फोंडा आरोग्य खात्याचे स्वच्छता निरीक्षक मनोज नाईक यांनी सांगितले. दरम्यान, फोंडा तालुक्यात मलेरिया तसेच चिकुनगुनियाचा एकही रुग्ण नसल्याची माहिती विविध ठिकाणच्या आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

कशामुळे होतो डेंग्यू

डेंग्यू ताप ज्याला हाडमोडी ताप म्हुणुन देखील ओळखले जाते हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू (DENV) विषाणूंमुळे संक्रमित होतो. इडिस इजिप्‍ती डासाच्या चावण्यामुळे तो प्रसारित होतो. संक्रमणात्मक डास चावल्यानंतर ५-६ दिवसानंतर मनुष्याला हा तीव्र फ्लूसारखा आजार होतो. ह्या तापाचे दोन प्रकार आहेत. पहिला म्हणजे डेंग्यू ताप आणि दुसरा डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (डीएचएफ). रक्तस्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असून, त्यामुळे जीव देखील दगावू शकतो.

काय आहेत उपचार

डॉक्टरांच्या माहितीनुसार, ताप असेपर्यंत आराम घ्यावा. ताप आल्यानंतर अंगावर काढू नये (४-५ दिवसांपेक्षा जास्त). लगेचच पेशंटला डॉक्टरांकडे घेउन जावे. निर्जलीकरण होऊ नये म्हणून जलपेयांचा भरपूर सेवन करावं. पपया चा वापर हा डेंगू बरा करण्यासाठी केला जातो. डेंग्यू हू द्यायचा नसेल तर डासांना आळा घालणे हा एकमेव उपाय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT