Gautam Gambhir Angry: "टेम्बा बावुमाची बॅटिंग पाहा..." टीम इंडियाच्या 'फ्लॉप शो'वर गंभीर भडकला; फलंदाजांच्या क्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह Watch Video

IND vs SA 1st Test: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
Gautam Gambhir Angry
Gautam Gambhir AngryDainik Gomantak
Published on
Updated on

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला. १२४ धावांचे आव्हानात्मक पण साध्य करण्याजोगे लक्ष्य भारतीय फलंदाजांना पार करता आले नाही. त्यामुळे संघाच्या फलंदाजीवर तसेच खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. मात्र मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पिचमध्ये कोणतीही कमतरता नसल्याचे स्पष्ट केले असून हा पराभव केवळ फलंदाजांच्या बेजबाबदार खेळीचा परिणाम असल्याचे ते म्हणाले.

कोलकात्यातील या सामन्यातील निराशाजनक पराभवानंतर गंभीर यांनी थेट फलंदाजांवर टीका केली. “१२४ धावांचे लक्ष्य फार मोठे नव्हते. खेळपट्टीत काहीही दोष नव्हता. दोन्ही संघांसाठी विकेट सारखीच होती. हो, थोडी फिरकी मिळत होती पण या परिस्थितीत संयमाने फलंदाजी करण्याची गरज होती. जो बचावावर विश्वास ठेवतो, तोच धावा करतो. टेम्बा बावुमा याने उत्तम उदाहरण ठेवले. सुंदरनेही उत्कृष्ट बचावात्मक खेळ केला,” असे ते म्हणाले.

Gautam Gambhir Angry
Goa Panchayat: गोव्यातील पंचायतींसाठी नवी माहिती! महिन्यातून होणार 4 बैठका; खात्‍याकडून मसुदा अधिसूचना जारी

नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा फलंदाजी करत १५९ धावा उभारल्या. भारतीय गोलंदाजांपैकी जसप्रीत बुमराहने अवघ्या २७ धावांत ५ बळी घेत प्रभावी कामगिरी केली. त्यानंतर भारताने पहिल्या डावात के.एल. राहुल (३९), वॉशिंग्टन सुंदर (२९), ऋषभ पंत (२७) आणि रवींद्र जडेजा (२७) यांच्या मदतीने १८९ धावा उभारल्या आणि ३० धावांची आघाडी घेतली.

Gautam Gambhir Angry
Goa Cricket: ..टॉस जिंकला, पण सामना गमावला! गोव्याच्या फलंदाजांची हाराकिरी; झारखंडकडून 15 धावांनी पराभव

दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात १५३ धावा केल्या आणि भारतापुढे १२४ धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र, लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. यशस्वी जयस्वाल (०) व के.एल. राहुल (१) यांनी निराशाजनक सुरुवात केली. ध्रुव जुरेल (१३), ऋषभ पंत (२), तर शेवटी वॉशिंग्टन सुंदर (३१) आणि अक्षर पटेल (२६) यांनी प्रयत्न केले, पण संघाला केवळ ९३ धावा करता आल्या.

गेल्या काही काळापासून कसोटी स्वरूपात भारताची घरच्या मैदानावरील कामगिरी चिंताजनक ठरत आहे. त्यांनी गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावली होती तर या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या पराभवानंतर भारताची कसोटी कामगिरी पुन्हा एकदा चर्चेत आली असून दुसऱ्या सामन्यात संघ कोणते बदल करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com