Mahadayi Water Dispute |Goa  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: अखेर ‘म्हादई-प्रवाह’ला तीन महिन्यांनंतर मुहूर्त

म्हादई रक्षणाचा महत्त्वाचा टप्पा : सावंत

गोमन्तक डिजिटल टीम

Mahadayi Water Dispute केंद्र सरकारने स्थापनेच्या घोषणेनंतर सुमारे तीन महिन्यांनंतर, अखेर म्हादई प्रवाह (कल्याण आणि सौजन्यशील प्रगतीशील नदी प्राधिकरण) किंवा म्हादई जल व्यवस्थापन प्राधिकरणाला म्हादई जल विवाद न्यायाधिकरणाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिसूचित केले आहे.

गोेव्याची जीवनदायिनी म्हादई रक्षणासाठीच्या लढ्यातील हा महत्त्वाचा टप्पा आहे, असे सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.

म्हादई जल विवाद लवादाने 14 ऑगस्ट 2018 रोजी याबाबतचा पाणीवाटपसंदर्भातील निर्णय दिला होता. त्यानंतर केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकच्या कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या सुधारित सविस्तर विकास आराखड्याला (डीपीआर) मंजुरी दिल्यानंतर गोवा सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.

याबरोबरच केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे आणि जलविवाद आयोगाकडे जल व्यवस्थापन प्राधिकरणाची मागणी केली होती. त्यानुसार केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने ‘म्हादई-प्रवाह’ नावाचे प्राधिकरण जाहीर केले होते. या प्राधिकरणाच्या घोषणेनंतर तीन महिन्यांनी हे प्राधिकरण अधिसूचित केले आहे.

प्राधिकरणाचे मुख्यालय पणजी येथे असेल. ‘म्हादई-प्रवाह’ची (कल्याण आणि सौजन्यशील प्रगतीशील नदी प्राधिकरण) स्थापना करण्यासाठी म्हादई जल व्यवस्थापन योजना २०२३ नावाची योजना तयार करण्यात आली आहे.

ही योजना 22 मे 2023 रोजी अधिसूचित करण्यात आली आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष पूर्णवेळ व स्वतंत्र असतील. उच्च प्रशासकीय श्रेणी किंवा सदस्य, केंद्रीय जल आयोगाच्या स्तरावरील केंद्रीय जल अभियांत्रिकी सेवा संवर्गातील अभियंता असलेले सेवारत अधिकारी आणि तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी नियुक्त केले जातील.

प्राधिकरणाचा तीन राज्यांना लाभ

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये एका ‘ट्विट’द्वारे केंद्राच्या निर्णयांची घोषणा केली होती, असे म्हटले होते की, हे प्राधिकरण ‘गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये परस्पर विश्वास आणि समज निर्माण करण्यास मदत करेल, ज्यामुळे याचा योग्य वापर सुनिश्चित होईल.’

या प्रदेशांच्या सर्वांगीण विकासासाठी म्हादई नदीचे पाणी कर्नाटकने वळवण्याविरुद्धच्या लढाईत प्राधिकरण मदत करेल, अशी गोव्याला आशा आहे.

आमच्‍या एका महत्त्वाच्‍या मागणीची पूर्तता करण्‍यासाठी ‘म्हादई-प्रवाह’ अधिसूचित करून पणजी येथे मुख्‍यालय स्‍थापना केल्याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार मानतो. हा महत्त्वपूर्ण निर्णय म्हादई मातेच्या रक्षणासाठी आमच्या सामूहिक प्रयत्नांमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

‘म्हादई-प्रवाह’चा गोव्याला कोणत्याच प्रकारचा फायदा होणार नाही. या प्राधिकरणामुळे जलविवाद आयोगाने दिलेल्या अंतिम निर्णयाला मान्यता दिल्यासारखे होणार आहे. हे प्राधिकरण आता पाणी वितरण करणार आहे. याला आमचा विरोध आहे.

- हृदयनाथ शिरोडकर, समन्वयक, सेव्ह म्हादई.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT