Mayem Lake Visited tourist Dainik Gomantak
गोवा

Mayem Lake : मयेतील पर्यटनाला तब्बल 8 वर्षांनंतर पुर्नवैभव; गोवा टुरिझमचा पुढाकार पुनर्वैभव

म्हापसा रेसिडेन्सी येथून पर्यटन सफरीला प्रारंभ

गोमन्तक डिजिटल टीम

पर्यटन स्थळ म्हणून देश-विदेशात प्रसिद्धीस पावलेल्या मये तलावाला अखेर आठ वर्षांच्या कालखंडानंतर पर्यटकांनी भेट दिली आहे. पर्यटन विकास महामंडळातर्फे या पर्यटन सफरीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी पर्यटकांचे स्वागत केले. यावेळी आनंद व्यक्त करीत ते म्हणाले, "मये तलाव जगाच्या नकाशावर प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला आले आहे, मात्र गेल्या आठ वर्षांत सुविधांच्या अभावामुळे तलावाला भेट देण्यास पर्यटक आले नाही".

म्हापसा रेसिडेन्सी येथून मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी झेंडा दाखवत सकाळी या पर्यटन सफरीला प्रारंभ करण्यात आला. या सफरीमध्ये मये तलाव, रुद्रेश्वर मंदिर, हरवळे येथील धबधबा आणि पांडव गुहा, साखळी येथील विठ्ठल मंदिर, नार्वेतील सप्तकोटेश्वर मंदिर आणि डॉ. सलीम अली वन्यजीव अभयारण्य चोराव ही स्थळे कव्हर करणार आहेत. एक काळ असा होता, की मये तलाव म्हणजे देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण ठरले होते. आता पर्यटन विकास महामंडळातर्फे पर्यटन सफरीचे आयोजन करण्यात आल्याने मये तलावाचे भाग्य उजळणार आहे. 

मये तलावाचा हवा तसा विकास झाला नसल्याने या तलावाकडे पर्यटकांनी पाठ फिरवली होती. सात वर्षांपूर्वी मयेचे तत्कालीन आमदार स्व. अनंत शेट यांच्या प्रयत्नातून तलावाच्या विकसित कामाचा प्रस्ताव मार्गी लागला. पर्यटन विकास महामंडळाकडून या तलावाचा विकास करण्यात आला आहे. विकासकामानिमित्त गेल्या सहा-सात वर्षांपासून मये तलाव पर्यटनासाठी बंद होता. मात्र आता या तलावात बोटिंग सुविधाही सुरु करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी या तलावस्थळी पर्यटकांना आकर्षित करणारी ‘बंजी जंपिंग’ सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आठ वर्षांनंतर पर्यटन विकास महामंडळाच्या पुढाकारातून पर्यटकांनी तलावाला भेट दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 3 तास खुर्चीला बांधून मारहाण, कान खेचल्याने कानाचा पडदा सुजला; दिल्लीतील प्लेस्कूलमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा छळ

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT