Viral on Social Media : धावत्या कारमध्ये पर्यटक तरुणीची स्टंटबाजी; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

एका वाहनचालकाने घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे.
Goa Tourist Viral Video
Goa Tourist Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

पर्यटन हंगाम सुरु असल्यामुळे गोव्यात सध्या पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र या गर्दीसोबतच पर्यटकांची कधी किनाऱ्यावर तर कधी भररस्त्यात स्टंटबाजी टीकेचा विषय ठरत आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात एक पर्यटक महिला धावत्या कारच्या खिडकीतून बाहेर डोकावत स्टंटबाजी करताना दिसतेय. रेंट अ कारमध्ये हा सर्व प्रकार घडला असून एका वाहनचालकाने घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे.

हा प्रकार नेमका कुठे घडला याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मात्र हा व्हिडीओ कळंगुट भागात शूट करण्यात आल्याचं बोललं जात आहे. रेंट अ कार प्रकारची कार भाड्याने घेत गोव्यात पर्यटक फिरत असतात. अशाच कारमधून ही स्टंटबाजी केल्याचं व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. GA 11 T 3568 नंबर असलेल्या कारमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे.

Goa Tourist Viral Video
Goa Accident : पर्वरीत अपघातग्रस्त ट्रकला दुसऱ्या ट्रकची धडक; वाहतुकीचे तीनतेरा

दरम्यान या कारच्या मागून जात असलेल्या एका दुसऱ्या प्रवाशाने या स्टंटबाजीचा व्हिडीओ रेकॉर्ड करत व्हायरल केला. दरम्यान अशाप्रकारच्या घटना गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात घडत असतात. मात्र प्रशासनाकडून या प्रकारांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांमधून होताना दिसत आहे.

मागच्याच आठवड्यात मिरामार बीचवर कार नेल्याप्रकरणी पोलिसांनी राजस्थानमधील पर्यटकांवर दंडात्मक कारवाई केली होती. तसंच काही महिन्यांपूर्वी रेंट अ कार घेऊन काही प्रवासी बीचवर गेल्याचाही प्रकार उघडकीस आला होता. अशा पर्यटकांवर कारवाई करुन त्यांच्यावर वचक बसवण्याचं मोठं आव्हान गोवा पोलिसांसमोर उभं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com