Bicholim Mining Issue Dainik Gomantak
गोवा

Bicholim Mining Issue: अखेर आठ दिवसानंतर 'वेदांता' सुरु, डिचोलीत खनिज वाहतुकीचा मार्ग मोकळा

Vedanta Mining: आठ दिवसांपूर्वी गेल्या सोमवारपासून ट्रकमालकांनी खाणीवरील खनिज वाहतूक बंद केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: तब्बल आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर डिचोलीतील 'वेदांता' खाणीवरील खनिज वाहतूक अखेर सुरू झाली आहे. आजपासून (मंगळवारी) स्थानिक ट्रक खनिज वाहतुकीसाठी रस्त्यावर उतरल्याने खाणीवर ट्रकांची धडधड सुरू झाली आहे.

सोमवारी झालेल्या बैठकीत कंपनी व्यवस्थापनाने ट्रकमालकांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर नियमित खनिज वाहतूक सुरू करण्याचा निर्णय ट्रकमालकांनी घेतला होता.

कंत्राटी पद्धतीने कामाला लावलेले बाराचाकी हायटेक ट्रक बंद करा, स्थानिक ट्रकांनाच काम द्या, अशी मागणी करीत आठ दिवसांपूर्वी गेल्या सोमवारपासून ट्रकमालकांनी खाणीवरील खनिज वाहतूक बंद केली होती.

याप्रश्नी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि प्रेमेंद्र शेट यांच्या उपस्थितीत गेल्या शनिवारी कंपनी व्यवस्थापन आणि ट्रकमालकांची बैठक होऊन 'सुवर्णमध्य' निघाला होता.

रिजेक्शनची वाहतूक कधी सुरु होणार?

१) हायटेक कंत्राटी टूक बंद करण्याचा निर्णय कंप वाहतूक आता स्थानिक ट्रकांनाच करावी लागणार आहे. मात्र, हे काम आज सुरू झाले नव्हते.

२) 'रिजेक्शन' वाहतुकीसंदर्भात आज (मंगळवारी) ट्रकमालकांनी खाणीवरील उपलब्ध साधनसुविधांची पाहणी केल्याची माहिती मिळाली आहे.

3) यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष राजाराम परब गावकर आणि पदाधिकारी उपस्थित होते. येत्या एक-दोन दिवसांत 'रिजेक्शन'ची वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT