Mla Chandrakant Shetye Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : ४० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर कातरवाडा रस्त्याचे भाग्य उजळले ; कामास प्रारंभ

Bicholim News :आमदार डॉ. शेट्ये यांच्या हस्ते उद्‍घाटन

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली, चाळीस वर्षांहून अधिक काळ प्रतीक्षेत असलेल्या येथील ‘आयडीसी’ परिसरातील कातरवाड्यावरील रस्त्याला आता चालना मिळणार आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे ४२ लाख रुपये खर्च करून हा प्रलंबित रस्ता करण्यात येणार आहे. आज एका कार्यक्रमात आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या उपस्थितीत या रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या साहाय्यक अभियंत्या रश्मी मयेकर, नगराध्यक्ष कुंदन फळारी, नगरसेवक पांडुरंग कोरगावकर, माजी नगरसेवक रामा नाईक, निसार शेख यांच्यासह गुरुदास कोरगावकर, श्यामू गावकर, दत्तू गावकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. नारळ वाढवून रस्ता कामास प्रारंभ करण्यात आला.

पक्का रस्ता नसल्याने पावसाळ्यात कातरवाडा येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. आता हा रस्ता झाल्यानंतर तेथील नागरिकांची चांगली सोय होणार आहे. या रस्त्यासाठी नागरिकांनी ना हरकत दाखला दिला आहे.

‘विकासासाठी सहकार्य करा’

डिचोली मतदारसंघाच्या विकासासाठी सरकारकडून भरीव सहकार्य मिळत आहे. सरकारच्या सहकार्यातून मतदारसंघात रस्ते आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत, असे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी यावेळी सांगितले. विकासासाठी जनतेने आडकाठी न आणता सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी दिले.

नगरसेवकाकडून सरकारला धन्यवाद

कातरवाडा येथील प्रलंबीत रस्त्याच्या कामाला चालना मिळाल्याबद्दल नगरसेवक पांडुरंग कोरगावकर यांनी समाधान व्यक्त करून आमदारांसह सरकारला धन्यवाद दिले.

अन्य प्रलंबीत रस्तेही मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT