Yatish Naik, Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'बिनबुडाचे आरोप करणे थांबवावे', नाईकांनी सुनावले खडे बोल; पाटकरांचे घुमजाव

Yatish Naik: ॲड. यतीश नाईक म्हणाले, पाटकर यांच्या ‘आपण विश्वजीत असे म्हटले होते, विश्वजीत राणे असे म्हटले नव्हते’ या दाव्याला काहीच अर्थ नाही. त्यांनी आरोप केलेली खाती विश्वजीत राणे यांच्याकडेच आहेत. त्यामुळे त्यांना विश्वजीत राणे असेच म्हणायचे होते हे कोणीही सांगू शकेल.

गोमन्तक डिजिटल टीम

Yatish Naik On Allegations Of Amit Patkar About Vishwajit Rane

पणजी: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी खोट्या आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे बिनबुडाचे आरोप करणे थांबवावे. विरोधी पक्षाचे जबाबदार नेते या नात्याने जबाबदारीने त्यांनी बोलावे, असे भाजपचे प्रवक्ते ॲड. यतीश नाईक यांनी आज पाटकर यांना पत्रकार परिषदेत सुनावले.

ते म्हणाले, आपणच कागदपत्रे बनावट आहे असे पाटकर सांगतात आणि त्याच कागदपत्रांच्या आधारे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यावर आरोप करतात, यामुळे त्यांचेच हसे होत आहे.

ॲड. यतीश नाईक म्हणाले, पाटकर यांच्या ‘आपण विश्वजीत असे म्हटले होते, विश्वजीत राणे असे म्हटले नव्हते’ या दाव्याला काहीच अर्थ नाही. त्यांनी आरोप केलेली खाती विश्वजीत राणे यांच्याकडेच आहेत. त्यामुळे त्यांना विश्वजीत राणे असेच म्हणायचे होते हे कोणीही सांगू शकेल. ‘मी राणे म्हटले नव्हते’ असे म्हणणे त्यांची अपरिपक्वता दर्शवते. ते एका मोठ्या पक्षाचे राज्यातील नेते आहेत याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे. त्यांच्या पक्षात त्यांना कोणी गांभीर्याने घेत नसले, तरी प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जबाबदारीने आरोप केले पाहिजेत.

पाटकर यांनी दोन दिवसांनी पोलिसांत तक्रार केली की नाही याची माहिती नाही. मंत्री राणे यांनी सायबर गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक आणि पोलिस महासंचालकांकडे ९ नोव्हेंबर रोजीच ईमेलच्या माध्यमातून तक्रार केली आहे. पाटकर यांनी फडकावलेल्या कागदपत्रांची शहानिशा करावी आणि त्यांनी जारी केलेल्या ध्वनिफितीचा उगम तपासावा यासाठी राणे यांनी पोलिसांना विनंती केली आहे.

पाटकर यांनी याची माहिती न घेताच राणे यांनी तक्रार केली नाही असे म्हटले आहे. तक्रार ते महाराष्ट्रात जाताना सिमेवरच सांडली काय अशी विचारणा करणे हा पाटकर यांचा निव्वळ बालिशपणा आहे. तो त्यांनी करू नये. पाटकर यांना तक्रार देण्यासाठी दोन दिवस लागले असतील, पण राणे यांनी त्याचदिवशी तक्रार करून सत्य शोधण्याची पोलिसांना विनंती केली आहे, असे त्यांनी सांगितले.

विश्वजीत यांनी पैसे घेतले असे आपण म्हटलेच नाही; पाटकर

आपण घेतलेल्या पत्रकार परिषदेत जी ऑडिओ क्लिप ऐकविली होती, त्यात एक महिला विश्वजीत यांचे नाव घेते. त्यामुळे आपण तो विश्वजीत कोण? असा सवाल केला होता व त्या ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळून पाहायला हवी, अशी आपली मागणी होती. आपण विश्वजीत यांनी पैसे घेतले किंवा त्यांचा यात सहभाग असल्याचे काहीही म्हटले नाही. परंतु आपली पत्रकार परिषद व्यवस्थित न ऐकता राज्यातील मंत्री आणि आमदार कालपासून विश्वजीत यांना क्लिनचिट देण्यासाठी पुढे सरसावले आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली.

अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने काल पोलिस महासंचालकांकडे ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन बनावट कागदपत्रे व ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन दिल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत वरील टीका केली.

पाटकर म्हणाले, मागील आठवड्यात ८ रोजी ‘कॅश फॉर जॉब’ याविषयी आपण पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी काही कागदपत्रे दाखविली होती आणि एक ऑडिओ क्लिपही ऐकवली होती आणि त्याबाबत आम्ही पोलिस महासंचालकांकडे तक्रार करणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच मुख्यमंत्र्यांच्या संरक्षणातील एका पोलिसाने पत्नीच्या सरकारी नोकरीसाठी पैसे दिले, त्याच्या चौकशीची त्यावेळी आम्ही मागणी केली होती. आपल्या पत्रकार परिषदेत जी कागदपत्रे आहेत, ती बनावट दिसत आहेत. ज्या खात्याचे नाव आहे, त्यावर एचओडीचे बनावट नाव लिहिले आहे, त्या एचओडीने पोलिस तक्रार करावी, अशी आपली मागणी होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT